Maharashtra Corona Update: राज्यात 39 हजार 207 नव्या रुग्णांची नोंद; 53 रुग्णांचा मृत्यू

राज्यात गेल्या 24 तासात 39,207 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 72,82,128 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 38,824 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.
coronavirus
coronavirusSaam Tv

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39,207 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 72,82,128 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 38,824 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 68,68,816 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. (Maharashtra Corona Update)

गेल्या 24 तासात 53 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,885 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,67,659 रुग्ण अॅक्टीव आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.

coronavirus
Mumbai: पालिका बेस्टला देणार ६ हजार ६५० कोटींच अनुदान; प्रस्ताव महासभेत मंजूर

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

गेल्या 24 तासात राज्यात एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत 1860 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 1,001 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com