Pandharpur News : विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात; एक ठार, 37 जखमी

सर्व जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
pandharpur, vitthal rukmini mandir, mangalvedha
pandharpur, vitthal rukmini mandir, mangalvedhasaam tv

Mangalvedha Accident News : विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या आराम बसचा मंगळवेढ्या जवळ भीषण अपघात झाला. यामध्ये एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पाेलिस (police) पाेहचले असून अपघाताचा तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

pandharpur, vitthal rukmini mandir, mangalvedha
Raj Thackeray Parli Court Updates : न्यायाधीशांचा राग अनावर; असं काय घडलं राज ठाकरेंच्या सुनावणीत

मंगळवेढ्या पासून जवळ असलेल्या येड्राव‌ फाटा येथे आज (बुधवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या बसला हा अपघात झाला. या अपघातात बस रस्त्याच्या बाजूस उलटी झाली. या अपघातात (accident) 37 भाविक जखमी (injured) झाले आहेत.

pandharpur, vitthal rukmini mandir, mangalvedha
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : हिंदुत्ववाद्यांचा पंढरीतील डाव हाणून पाडणार : डाॅ. भारत पाटणकर

घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अपघातग्रस्त सर्व भाविक हे मध्यप्रदेश (madhya pradesh) येथील आहेत. ते विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला निघाले हाेते. सकाळी सहाला बसला अपघात झाला. एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 37 भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com