अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून नगर शहराची सोशल मीडियात खूप बदनामी होते आहे. खड्ड्यांमुळे हे प्रकरण थेट कोर्टात गेले आहे. कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार आहे. आता ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहरातील रस्त्यावरील खांबांवर एलईडी दिवे बसविण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याबाबतची वर्क अॉर्डर निघाली आहे. संबंधित कंपनीकडून येत्या आठ दिवसांत दिवे बसविण्यास प्रारंभ होणार आहे. सुमारे 30 हजार दिवे शहरात बसविण्यात येतील, अशी माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली. 30,000 LED lights to be installed in Ahmednagar city abn79
याबाबत महापालिकेत बैठक झाली. या वेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले तसेच अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरातील अनेक खांबांवर पथदिवे नाहीत. बल्ब खराब होणे, वायर तुटणे, दिवा फुटणे असे अनेक प्रकार घडून दिवे बंद झाले आहेत.
उपनगरांमध्ये तर अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. याबाबत महापालिकेच्या सभांमध्ये वादळी चर्चा झाली होती. महापालिकेचे सुमारे २५ हजार पथदिवे आहेत. त्यातील सुमारे २५ ते ३० टक्के दिवे कायम बंद असतात. त्याच्या देखभालीचा खर्चही मोठा असतो. याबाबत नागरिकांच्या कायम तक्रारी येतात. आता नव्याने एलईडी बसविण्यात येणार असल्याने संबंधित ठेकेदार कंपनीकडे देखभाल व दुरुस्ती आहे. महापालिकेच्या वीजबिलातही सुमारे १३ लाखांची बचत होणार आहे. दिवाळीपर्यंत सर्व शहरात भागात या दिव्यांचा लखलखाट होणार आहे. 30,000 LED lights to be installed in Ahmednagar city abn79
महापालिकेचा काय फायदा...
पथदिवे सुरू ठेवण्यासाठी संस्थेला दरमहा जीएसटीसह ४५ लाख ४६ हजार ६९४ व संभाव्य वीजबिल सुमारे ११ लाख ४६ हजार प्रमाणे एकूण ५६ लाख ९३ हजार ४१४ रूपये संबंधित एजन्सीला द्यावे लागणार आहेत. सध्या शहरात सुमारे ३० टक्के पथदिवे बंद आहेत तरीही ५८ लाख रूपये द्यावे लागतात. या प्रकल्पामुळे महापालिकेचा दर महिन्याचा खर्च एक लाखाने कमी होणार आहे. शहरात नवीन पथदिवे बसविण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला जाणार आहे. तब्बल सात वर्षे ही संस्था देखभाल व दुरूस्ती करणार आहे.
तक्रार न सोडवल्यास दंड
ई स्मार्ट कंपनी शहरात दिवे लावणार आहे. प्रत्येक खांबाला नंबर दिले जातील. नागरिकांनी दिवा बंद असल्याबाबत तक्रार केल्यास चोवीस तासांत तेथे दुरूस्ती झालेली असेल, ती तक्रार निकाली न काढल्यास महापालिका दंड आकारणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.