मराठा आरक्षणाचा मुद्दा पेट घेण्याची शक्यता आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. इतकेच नाही तर सरकारही त्यांच्या मागण्यापुढे झुकताना दिसत आहे. अशातच धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेत आत्महत्या केलीय.(Latest News on Maratha Reservation)
किसन चंद्रकांत माने, असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. किसन माने हा उमरगा तालुक्यातील माडज येथील रहिवाशी होता. मराठा समाजाला आरक्षण मिळाणं गरजेचं आहे, असं म्हणत किसनने तलावात उडी घेतली. या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत.
जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष गेलं. आरक्षणासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेत. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मंगेश सांबळे या सरपंचाने स्वत:ची कारच पेटवली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.