Today's Marathi News Live: मातोश्रीवरील महाविकास आघाडीची बैठक संपली

Maharashtra Latest News and Update in Marathi (25 March 2024 ): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
25 March 2024 Live News of on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra | Saam TV Live
25 March 2024 Live News of on Kejriwal, Mahavikas Aghadi Seat Sharing, Congress Candidate List, Loksabha Election 2024 and Overall Maharashtra | Saam TV LiveSaam Tv

मातोश्रीवरील महाविकास आघाडीची बैठक संपली

मातोश्रीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीवर जागावाटप, भिवंडी आणि सांगली या दोन जागांवर चर्चा झाली. तसेच प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकर यांच्यावरही चर्चा झाली. ही बैठकीनंतर शरद पवार, जयंत पाटील निघाले आहेत.

मातोश्रीवर महाविकास आघाडीची बैठक सुरु 

मागील तासाभरापासून उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाची बैठक सुरूच.

भिवंडी आणि सांगली या दोन जागांवर खलबते सुरु आहे.

तसेच प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकर यांच्यावर देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

सोलापूरचा सालगडी म्हणून काम करणार : राम सातपुते

राम सातपुते काय म्हणाले?

मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे.

सुशील कुमार शिंदे ज्यावेळेस करमाळ्यातून जाऊन निवडणूक लढले, त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते का?

सोलापूरचा सालगडी म्हणून काम करणार

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक

शरद पवार घेणार उद्धव ठाकरेंची भेट

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री ह्या निवास स्थानी ही बैठक पार पडेल

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर तिढा कायम आहे. याच जागांवर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा संध्याकाळी मविआची बैठक होणार आहे.

या बैठकीला शरद पवारांसह संजय राऊत आणि इतर प्रमुख नेत उपस्थित असणार आहेत.

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील तिढा वाढला

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील तिढा वाढला आहे.

काल शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर आज भाजपचे पदाधिकारी सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील, नाशिक भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह अनेक पदाधिकारी सागर बंगल्यावर

- नाशिकच्या जागेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच

महाडमध्ये दुर्घटना! सिमेंट मिक्सर पलटी; २ कामगार अडकले

Summary

महाडच्या मांडले या स्थानिक नदीवर बंधाऱ्याचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. काम सुरू असताना सिमेंट मिक्सर पलटी होऊन दोन कामगार अडकले. पोलिस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू आहे.

पुण्यात उद्या अजित पवार यांनी बोलवली आमदारांची बैठक

पुण्यात उद्या अजित पवार यांनी बोलवली आमदारांची बैठक

⁠पुण्यातील बोट क्लब येथे होणार बैठक

⁠दुपारी 12 वाजता राज्यातील अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक

⁠आमदारांची बैठक दर मंगळवारी मुंबईत होत असते, मात्र उद्या अजित पवार पुण्यात असल्याने ही बैठक पुण्यात होणार आहे

⁠राज्यभरातील अजित पवार गटाचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार

महाबळेश्वरातील आंबेनळी घाटात टेम्पो खोल दरीत कोसळला

Satara News :

महाबळेश्वरातील आंबेनळी घाटात टेम्पो खोल दरीत कोसळला

मेटतळे या गावाजवळील घटना

टेम्पोसुमारे 400 फुट खोल दरीत कोसळल्याची माहिती

टेम्पोत प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती

महाबळेश्वर ट्रॅकरचे जवान घटनास्थळाकडे रवाना

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनाचा विचित्र अपघात, एक जण जागीच ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनाचा विचित्र अपघात, एक जण जागीच ठार

कारचा चक्काचूर, दोन जण बचावले

पुण्याहून मुंबईकडे येणारा दूध टँकर खोपोली हद्दीत बोर घाट उतरताना लेन बदलत असताना टँकर कलंडला आणि अपघात झाला

अपघातग्रस्त टँकरने कार आणि ट्रकला जोरदार धडक दिली

टँकरमधील दूध रस्त्यावर सांडले

अपघातग्रस्त दूध टँकर चालकचा या अपघातात मृत्यू

प्रीतम मुंडे यांना अहमदनगरच्या पाथर्डीमधून आमदारकीची उमेदवारी द्यावी, समर्थकांची मागणी

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना आमदारकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी आता पाथर्डीमधून जोर धरू लागली आहे.

पंकजा मुंडे नेहमीच म्हणत असतात परळी माझी आई आहे, तर पाथर्डी माझी मावशी आहे.

त्यामुळे पाथर्डी मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

त्यामुळे या मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी आता भाजपच्या प्रदेश सचिव असलेले अरुण मुंडे आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केली आहे.

शिवसेनाच्या 15-16 जागांची उद्या ठाकरे गट करणार घोषणा, संजय राऊत यांची माहिती

शिवसेनाच्या 15-16 जागांची उद्या ठाकरे गट करणार घोषणा

संजय राऊत यांची माहिती

शिवसेनेचा मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून होणार अधिकृत घोषणा

आज मातोश्री येथे होणाऱ्या बैठकीत शरद पवार यांना दाखवली जाणार शिवसेनेच्या 15 जागांची यादी

हिंगोलीच्या वसमत शहरालगत असलेल्या हळदीच्या एका मोठ्या गोडाऊनला आग

हिंगोलीच्या वसमत शहरालगत असलेल्या हळदीच्या एका मोठ्या गोडाऊनला आग

वसमत पालिकेच्या अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले

गोडाऊनमधील प्लास्टिक पिशव्यांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची खरेदी केलेली कोट्यवधी रुपयांची हळद जळून खाक

नाशिकमधील करंजाळी घाटातील वाहतूक ठप्प

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात करंजाळी घाटात ट्रक फेल

घाटातील वाहतूक ठप्प, वाहनांच्या पाच-पाच किलोमीटरपर्यंत रांगा

सकाळी 5.30च्या सुमारास घडली घटना

दिल्लीतील अलीपूर परिसरात फॅक्टरीला भीषण आग

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील 42 गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील 42 गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती

पाटबंधारे विभागाचे कर्मचारी सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने पैनगंगा नदीत पाणी सोडण्यास अडचण

महिलांची हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर कडक ऊन्हात पायपीट

42 गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ऐन निवडणुकीच्या काळात पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता

होळी आणि आज रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीणमध्ये पोलीस यंत्रणा अलर्टवर

होळी आणि आज रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीणमध्ये पोलीस यंत्रणा अलर्टवर

ग्रामीण भागात महामार्गावर पोलीसांची नाकाबंदी

संशयास्पद वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी

बनावट मद्य आणि इतर बेकायदा घटना रोखण्यासाठी पोलीस सज्ज

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघ निवडणुकीत (JNSU) डाव्या संगठणांचा विजय

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघ निवडणुकीत (JNSU) डाव्या संगठणांचा विजय

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहसचिव या चारही जागांवर डाव्यांचा विजय

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पॅनल चा पराभव

धनंजय 2973 मते मिळवून विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तर उपाध्यक्ष पदी अविजित घोष यांचा विजय

JNU मधे 4 वर्षानंतर निवडणुका झाल्या होत्या त्यामुळं या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं हो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com