Heart Attack In Gym : व्यायाम करताना २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

ही संपूर्ण घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Heart Attack In Gym
Heart Attack In GymSaam Tv

Heart Attack In Gym News : तुम्ही जर रेग्युलरही जिममध्ये व्यायाम करत असाल तर थोडं सावधान. कारण जिम करताना एका २४ वर्षीय उत्तम शरीरयष्टी असलेल्या कॉन्स्टेबलचा हृदयविकाराचा झटक्याने जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे रेग्युलर जिम करणाऱ्यानीही काळजी घेतली पाहिजे.

चालताना, नाचताना, जिममध्ये किंवा घरी व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू होत असल्याचं आपण नेहमी पाहतो. पण रेग्युलर जिम करणाऱ्या आणि उत्तम बॉडी असणाऱ्यांना धोका असेल कधी वाटलं नव्हत.

Heart Attack In Gym
Pune Crime News : अनोळखी महिला रात्री ३ वाजता इमारतीत आली; नागिरकांनी घेरताच महिलेने केलं धक्कादायक कृत्य

पण हैदराबादमध्ये (Hyderabad) घडलेली ही घटना पाहिली तर थरकाप उडेल. हैदराबादमधल्या आसिफ नगर पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या २४ वर्षीय विशाल नावाच्या एका कॉन्स्टेबलचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. जिममध्ये (Gym) व्यायाम करताना तो अचानक कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, भारतातील एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू तरुण लोकसंख्येसह हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे होतो. पूर्वीच्या तुलनेत ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येणे अधिक सामान्य होते. परंतु, अलीकडच्या काळात हे सामान्यपणे तरुण वयोगटात दिसून येते.

कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके अचानक थांबते. हृदयविकाराचा झटका नेहमी अचानक होतो आणि त्यापूर्वी कोणतीही विशिष्ट चिन्हे नसतात. या दरम्यान हृदय शरीरात रक्त पंप करणे थांबवते आणि व्यक्ती बेशुद्ध पडते. या स्थितीत त्वरित उपचार न मिळाल्यास काही मिनिटांतच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्यासाठी आता डॉक्टरांचा सल्ला नीट ऐकला पाहिजे.

दररोज व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर असते. त्यासाठी आता शहरात जिम जॉईन करतायत. मात्र जिममध्ये व्यायाम करताना काळजी घेतली जात नसल्याने उत्तम शरीर आणि आरोग्य असतानाही बळी पडाव लागतंय. त्यामुळे जिम जॉईन नक्की करा पण कार्डीऑलॉजीस्ट आणि जिम ट्रेनरच सल्ला नक्की घ्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com