Amravati News : फडणवीसांसह तानाजी सावंतांवर जनतेचा राेष; अमरावतीत डेंग्यू, चिकनगुनिया राेखण्यासाठी हालचाली सुरु

नागरिकांनी एक दिवस कोरडा पाळावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Amravati, Dengue
Amravati, Dengue saam tv

- अमर घटारे

Amravati News : अमरावती जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्ण वाढू नयेत यासाठी आराेग्य विभागाने ठाेस पावलं उचलली आहेत. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून बाधित गावांना भेटी देण्यात येणार आहे जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी (dr sharad jogi) यांनी दिली. (Breaking Marathi News)

Amravati, Dengue
Nashik Crime News: 5 लाखांच्या खंडणीसाठी दुकानात ठेवला गावठी बॉम्ब, दाेघांना अटक

गेल्या दाेन महिन्यांत अमरावती जिल्ह्यात १०५ नमुने मलेरिया तपासणी करिता घेण्यात आले होते. यातील २१ रुग्ण डेंगूचे (dengue) पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. यासोबतच ८ चिकनगुनियाचे देखील रुग्ण आढळले. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील जनता साथ रोगाने मेटाकुटीला आली असताना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) व आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांच लक्ष कुठाय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

Amravati, Dengue
Sharad Pawar In Karad : शरद पवारांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण; 'यापूर्वी मी बाेललाे आणि अडचणीत आलाे' (पाहा व्हिडिओ)

दरम्यान पावसाळा सुरू झाला असल्याने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होताच डेंग्यू , मलेरियासह इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून बाधित गावांना भेटी देण्यात येणार आहे अशी माहिती (amravati) आरोग्य विभागाने दिली.

Amravati, Dengue
Vasai News: भोईदापाडात पाेलिसांची जिगरबाज कामगिरी, पेटत्या कारमधून तिघांना काढलं बाहेर

अशी घ्या काळजी

पाणी साठून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये याची काळजी घ्या.

पाणी साठविण्यात येणारी भांडी नेहमी स्वच्छ ठेवा.

कुलरमधील पाणी, घराचा छतावर नारळाची करवंटी, टायर व अन्य वस्तूंमध्ये पावसाचे पाणी जमा होणारे याची काळजी घ्या.

एक दिवस कोरडा पाळा.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com