नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर, विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले

नांदेड जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे. अतिवृष्टीमुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले गेले आहेत. नांदेडमध्ये स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.
नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर, विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले
नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर, विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडलेसंतोष जोशी
Published On

नांदेड: मुसळधार पावसामुळे नांदेडच्या गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले गेले आहेत. या प्रकल्पातून दोन लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीचे पाणी पातळी धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असल्याने प्रकल्पाचे चौदा दरवाजे उघडण्यात आले आहेत. शिवाय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (14 gates of Vishnupuri project opened due to Heavy rains in Nanded district)

हे देखील पहा -

स्मशानभूमीही पाण्यात

सतत पडणाऱ्या पावसामुळे नांदेड शहरातील गोदावरी नदीनं आता रौद्र रूप धारण केलयं. नदीकाठच्या गोवर्धन घाट पुलाच्या जवळील शांतीधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. दोन दिवसांपासून येथील अंत्यसंस्कार बंद करण्यात आले आहेत. नदीकाठचे अनेक घाट पाण्याखाली गेले आहेत. शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

पुरात वाहून जाणाऱ्याला वाचवले

नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. काल सायंकाळी ही घटना घडली होती. सुरज इंगोले असं वाचविण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नाळेश्वर - रहाटी या गावाजवळील नदीला पुर आला होता. या नदीच्या पुलावरुन मोबाईल टॉवरसाठी डिझेल घेऊन जात असताना सुरेश इंगोले हा दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला असता, गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत वाहून जात असलेल्या इंगोलेला दुचाकीसह सुखरुप बाहेर काढले त्यामुळे गावकऱ्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर, विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले
World Heart Day 2021: जागतिक हृदय दिनानिमीत्त वोकहार्ड हॉस्पिटलची अनोखी मोहीम

उमरखेड रस्ता वाहतुकीसाठी बंद

दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव जवळील पैनगंगा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत आहे. नांदेड - उमरखेड राज्य मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. नदीचं पात्र दुथडी भरून वाहत असून आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पैनगंगेवरील कुणीही अनाठायी धाडस करु नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com