Menstrual Hygiene : १ रुपयात मिळणार १० सॅनिटरी पॅड; ग्रामविकास मंत्रालयाची मोठी घोषणा

10 sanitary pads for only 1 Rupee In Maharashtra : आज 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस' आहे. यानिमित्ताने ग्रामविकास मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
10 sanitary pads for only 1 Rupee a Big announcement from the Minister Hasan Mushrif
10 sanitary pads for only 1 Rupee a Big announcement from the Minister Hasan MushrifSaam Tv
Published On

कोल्हापूर: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त (World Menstrual Hygiene Day 2022) राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून (Rural Development & Panchayat Raj Department of Maharashtra) मोठी घोषणा करण्यात आली. राज्यातील ६० लाख महिलांना नाममात्र १ रुपयात १० सॅनिटरी नॅपकिन/ सॅनिटरी पॅड (Sanitary Pads) देण्यात येणार आहेत. (10 sanitary pads for only 1 Rupee a Big announcement from the Ministry of Rural Development, Government of Maharashtra)

हे देखील पाहा -

या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील महिला आणि महिला (Women) बचत गटाच्या महिलांना होणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. महिला बचत गट आणि रेशनिंग दुकानाच्या माध्यमातून या नॅपकिनचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वापरलेले पॅड् नष्ट करण्यासाठी गावागावात मशीन्स बसवण्यात येणार आहेत. या योजनेसाठी २०० कोटी रुपये खर्च शासन करणार आहे. आज 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस' आहे. यानिमित्ताने ग्रामविकास मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

या दिवसाबद्दल -

२८ मे २०१४ मध्ये वॉश युनायटेड ऑफ जर्मनी या एनजीओने मासिक पाळी स्वच्छता दिवस पहिल्यांदा साजरा केला. महिलांचे (Womens) मासिक पाळीचे चक्राचा कालावधी हा २८ दिवसांचा असतो. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी २८ तारीख निवडण्यात आली.

10 sanitary pads for only 1 Rupee a Big announcement from the Minister Hasan Mushrif
पुणे जिल्ह्यात 77 टक्के मान्सूनपूर्व पावसाची तूट; IMD ने काय माहिती दिली?

स्वच्छतेची काळजी -

आजही जगभरात (World) अनेक स्त्रिया अशा आहेत ज्या याविषयावर सहजपणे बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांना मासिक पाळीच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या त्यामुळे कोणत्या प्रकारची समस्या कशामुळे उद्भवू शकते, स्वच्छतेच्या मदतीने कोणते आजार टाळता येतात आदीची माहिती त्यांना मिळत नाही. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेवर अधिक भर द्यायला हवा. याकाळात स्वच्छता न राखल्यास इन्फेक्शनचा धोका आहे. तसेच अनेक महिलांच्या इनफर्टिलिटी संबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. हेपेटायटीस बी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, योनीमार्गाचा संसर्ग यांसारख्या गंभीर आजारांकडे ढकलू शकते हेही त्यांना माहीत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com