अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षिस; राष्ट्रवादीच्या नेत्याची घोषणा

अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.
Abdul Sattar
Abdul Sattar Saam TV
Published On

जालना : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केला. सर्वच स्तरातून याबाबत टीका झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे. राज्यभर अब्दुल सत्तार यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा तौर यांनी तर अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे.

अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. मात्र अब्दुल सत्तार यांचे जो कुणी कपडे फाडेल त्याला दहा लाख रुपये बक्षीस दिलं जाईल अशी घोषणाच रेखा महेश तौर यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Abdul Sattar
अब्दुल सत्तारांच्या बेताल वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात. परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे.

Abdul Sattar
Devendra Fadnavis: अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य अतिशय चुकीचंच, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांनाही सुनावलं

मुख्यमंत्र्यांचा शेवटचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे अब्दुल सत्तार यांना अखेरचा इशारा दिला आहे. यापुढे कुठल्याही वादात सत्तारांचे नाव आल्यास मंत्रिपद अडचणीत येऊ शकते. तसेच सत्तारांना माध्यमांपासूनही लांबच राहण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापुढे माध्यमांना पक्षातील मुख्य नेते व प्रवक्ते हेच प्रतिक्रिया देतील, अशी तंबी मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांना दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com