Yashwant Sena : यशवंत सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; ६ उमेदवारांची नावे जाहीर

Lok Sabha Election 2024 : यशवंत सेनेच्या वतीने संजय अण्णा क्षीरसागर यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आली आहे. तर अण्णासाहेब रुपनर यांना माढा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. समाधान बाजीराव पाटील.
Lok Sabha Election 2024
Yashwant SenaSaam TV

Yashwant Sena News :

अनेक वेळा आंदोलन मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने, आता यशवंत सेना देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेचेच्या सहा उमेदवारांची यादी देखील जाहीर केलीये.

Lok Sabha Election 2024
Shiv Sena News: शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर! कुणाकुणाला संधी?

पहिल्या टप्प्यात एकूण सहा उमेदवार जाहीर झाले आहेत. यामध्ये सोलापूर, माढा, रावेर अहमदनगर, धुळे आणि कोल्हापूर या मतदारसंघाचा समावेश आहे. तर या लोकसभेच्या निवडणुकीत एकूण 15 उमेदवार यशवंत सेनेच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहेत.

यशवंत सेनेच्या वतीने संजय अण्णा क्षीरसागर यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आली आहे. तर अण्णासाहेब रुपनर यांना माढा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. समाधान बाजीराव पाटील यांना रावेर येथील उमेदवारी देण्यात आलीये.

अहिल्यानगर येथून गंगाधर कोळेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. धुळे येथून हिरालाल कन्नूर हे यशवंत सेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर कोल्हापूरमधून जयसिंग आप्पा सुतार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सध्याचे सरकार हे धनगर विरोधी सरकार असल्याची टीका बाळासाहेब दोडतले यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना केलीये. त्यामुळे आता आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरूनच सरकारला उत्तर देणार, असा इशारा देखील यावेळी यशवंत सेनेकडून देण्यात आला आहे.

Lok Sabha Election 2024
Maharashtra Lok Sabha : उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिंदे गटाला उमेदवार मिळेना; महागुरुंसह दोन बड्या कलाकारांचा निवडणुकीस नकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com