Who is Mukesh Dalal: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच विजयी होणारा हाच तो भाजप उमेदवार! जाणून घ्या, कोण आहेत मुकेश दलाल?

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. मात्र याआधीच सुरतमधून भाजपसाठी मोठी बातमी समोर आली आहे. येथून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच विजयी होणारा हाच तो भाजप उमेदवार! जाणून घ्या, कोण आहेत मुकेश दलाल?
Mukesh Dalal and Nilesh KumbhaniSaam Tv

Who is Mukesh Dalal:

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. मात्र याआधीच सुरतमधून भाजपसाठी मोठी बातमी समोर आली आहे. येथून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. कालच येथून काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज अवैध ठरला होता. यातच भाजपचे उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी आपली नावे मागे घेतल्याने मुकेश दलाल विजयी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधून एकूण 24 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काँग्रेसच्या उमेदवारांसह एकूण 12 जणांचे अर्ज अवैध ठरले. यानंतर भाजपचे उमेदवार वगळता इतरांनी नावे मागे घेतली. निवडणूक रिंगणात दुसरा उमेदवार नसल्याने मुकेश दलाल यांचा विजय झाला. गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनीही मुकेश कुमार दलाल यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, सुरतने पहिले कमळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच विजयी होणारा हाच तो भाजप उमेदवार! जाणून घ्या, कोण आहेत मुकेश दलाल?
Maharashtra Politics: सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस करणार कारवाई, नाना पटोले यांनी दिली माहिती

कोण आहेत मुकेश दलाल?

मोढ माणिक समाजातून येणारे मुकेश कुमार दलाल हे सुरत भाजपचे सरचिटणीस आहेत. तीन वर्षांहून अधिक काळ ते या पदावर आहेत. जनसंघाशी त्यांचा दीर्घकाळ संबंध आहे. सीआर पाटील यांचेही ते जवळचे मानले जातात. सुरत नगरपालिकेत ते स्थायी समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. ते भाजपचे शहर कार्यकारिणी सदस्य, तीन वेळा नगरसेवक आणि पाच वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चातही त्यांनी राज्यस्तरावर काम केले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यात बहुजन समाज पक्षाचे (BSP) प्यारेलाल भारती आणि बहुतांश अपक्षांचा समावेश आहे. प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये प्रथमदर्शनी तफावत आढळून आल्याने रविवारी रिटर्निंग अधिकाऱ्यांनी सुरत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज अवैध ठरवला.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच विजयी होणारा हाच तो भाजप उमेदवार! जाणून घ्या, कोण आहेत मुकेश दलाल?
Nashik Lok Sabha: महायुतीमधील नाशिकचा तिढा कायम! अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने वाढलं शिंदे गटाचं टेन्शन?

कुंभणी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यानंतर पक्षाचे पर्यायी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केलेले सुरेश पडसाळ यांचाही उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com