'उद्या काहीतरी निर्णय होईल', सांगली काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांचं सूचक वक्तव्य
Vishal Patil Saam Tv

Sangli Lok Sabha: 'उद्या काहीतरी निर्णय होईल', सांगली काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचं सूचक वक्तव्य

Vishal Patil News: ''आज राजकीय सुट्टी घेतली. उद्या काहीतरी निर्णय होईल. आम्ही टेन्शन घेत नाही'', असे सूचक विधान सांगली काँग्रेस लोकसभेचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे.

>> विजय पाटील

Sangli Lok Sabha Constituency:

''आज राजकीय सुट्टी घेतली. उद्या काहीतरी निर्णय होईल. आम्ही टेन्शन घेत नाही'', असे सूचक विधान सांगली काँग्रेस लोकसभेचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे. सांगलीतील पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने रमजान महिन्यानिमित्त दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ''सध्या जोरदार राजकीय गडबड सुरु आहे. या गडबडीत सुद्धा आम्हाला या कार्यक्रमाला यायचा योग जुळून आला. येता येईल की नाही याचे टेन्शन होते. पण आम्ही आज राजकीय सुट्टी घेतली. उद्या काहीतरी निर्णय होईल. आम्ही टेन्शन घेत नाही.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 'उद्या काहीतरी निर्णय होईल', सांगली काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांचं सूचक वक्तव्य
Eknath Khadse: पंधरा दिवसांमध्ये पक्षात मला प्रवेश द्यावा, एकनाथ खडसेंची भाजपला विनंती

दरम्यान, या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मात्र विशाल पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संवाद साधने टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.  (Latest Marathi News)

सध्या रमजान महिना सुरु आहे. अनेक मुस्लिम बांधव रमजानचा उपवास धरत असतात. अशातच लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे.

 'उद्या काहीतरी निर्णय होईल', सांगली काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांचं सूचक वक्तव्य
Chennai News: चेन्नई रेल्वे स्टेशनवर 4 कोटींची रोकड जप्त, भाजप कार्यकर्त्यांसह 3 जणांना अटक

सांगलीतील बदाम चौक येथील गुलकंद ग्राउंड येथे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com