Loksabha Election: एकनाथ शिंदेंची मुंबईत मोठी खेळी; अमोल किर्तीकरांविरोधात रविंद्र वायकर मैदानात?

Ravindra Waikar Vs Of Amol Kirtikar: मुंबईमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याविरोधात नुकतेच शिंदे गटात गेलेले रविंद्र वायकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
Ravindra Waikar News
Ravindra Waikar NewsSaam Tv
Published On

सचिन गाड मुंबई|ता. १३ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या सर्व २१ जागांचे उमेदवार घोषित करुन बाजी मारली असतानाच शिंदें सेना ठाकरेंविरोधात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. मुंबईमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याविरोधात नुकतेच शिंदे गटात गेलेले रविंद्र वायकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

ऐन लोकसभेच्या उद्धव ठाकरेंना धक्का देत आमदार रविंद्र वायकर यांनी एकनाथ शिंंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात होता. अशातच आता रविंद्र वायकर यांनाच मुंबई उत्तर-पश्चिममधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई उत्तर पश्चिमची जागा ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या ठिकाणी अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात आता उद्धव ठाकरेंचेच पुर्वीचे विश्वासू सहकारी मानले जाणारे रविंद्र वायकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर विरुद्ध रविंद्र वायकर असा सामना होऊ शकतो.

Ravindra Waikar News
Madha Lok Sabha: माढा लोकसभा मतदारसंघात नवा ट्वीस्ट; विश्वासू शिलेदार सोडणार शरद पवारांची साथ?

दरम्यान, शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी रविंद्र वायकर (Ravindra waykar) हे ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. जोगेश्वरी येथील विवादित भूखंडावर तथ्य लपवून पंचतारांकीत हॉटेल बांधण्याची परवानगी मिळवल्याप्रकरणी रविंद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र मुंबई महापालिकेने तक्रारीबाबत यु-टर्न घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास बारगळला. ज्यानंतर वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Ravindra Waikar News
Crime News: सोशल मीडियावर मैत्री, हॉटेलात नेऊन तरुणीवर अत्याचार; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com