Sachin Sawant : शिंदेंच्या शिवसेनेवर कमळाबाईचा कंट्रोल; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

Political News : शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निर्णयही भाजपा घेताना दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केलीये.
Sachin Sawant
Sachin SawantSaam TV

संजय गडदे

Lok Sabha Election :

बऱ्याच प्रतीक्षेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी आज जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उमेदवारी जाहीर करणे अपेक्षित असताना ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आलीये. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना शिंदे गटावर टिकास्त्र सोडलंय. कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना चालते, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

Sachin Sawant
Pune Lok Sabha Constituency: काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी नाट्य संपेना; फ्लेक्सवर 'नेत्याचा' फोटो टाकला नाही म्हणून थेट मंडपवाल्याला मारहाण

सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटले?

सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, महायुतीची महाशक्ती भाजपा आहे, यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निर्णयही भाजपा घेताना दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केलीये.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलने एकेकाळी चालणाऱ्या कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना चालते आहे हे स्पष्ट आहे, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"भाजपकडून श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप पूर्ण ताकदीने श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. मागच्या वेळी जितकी मतं मिळाली त्यापेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना महायुती निवडून आणेल.", असं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं.

Sachin Sawant
Devendra Fadnavis Speech : पोपटासारखे बोलणाऱ्यांना झापड बसली; नवनीत राणांबाबत खुशखबर देताना देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com