Loksabha Election: शिरुरमध्ये अमोल कोल्हेंचा भाजपला दे धक्का; अतुल देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार!

Maharashtra Politics: नुकतेच भाजपला रामराम ठोकलेले खेड आळंदी विधानसभेचे भाजपचे समन्वयक अतुल देशमुख आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
Shirur Loksabha Constituency News:
Shirur Loksabha Constituency News: Saamtv

Shirur Loksabha Constituency News:

एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नुकतेच भाजपला रामराम ठोकलेले खेड आळंदी विधानसभेचे भाजपचे समन्वयक अतुल देशमुख आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड आळंदी विधानसभेचे भाजपाचे समन्वयक अतुल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला (BJP) सोडचिठ्ठी दिली होती. भाजपाला रामराम केल्यानंतर आज अतुल देशमुख हे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला जाणार असल्याची माहिती आहे.

तसेच आज संध्याकाळी पाच वाजता अतुल देशमुख हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अतुल देशमुख हे उत्तर पुणे जिल्ह्यातील भाजपाचे मोठे नेतृत्व आहे. मात्र आता ते भाजपाला रामराम करत अमोल कोल्हेंच्या प्रचारात उतणार असल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे लोकसभेच्या रणधुमाळीत अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) हा भाजपला मोठा धक्का दिला आहे.

Shirur Loksabha Constituency News:
Leopard Attack: दुर्दैवी घटना! बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू; जुन्नर तालुका हादरला

भाजपातील अंतर्गत कुरघुडी आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या संघर्षामुळे अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम केला. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची भावना व्यक्त करत भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देत आम्हीच तुम्हाला सोडतोय अशी थेट भुमिका घेत अतुल देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirur Loksabha Constituency News:
Leopard Attack: दुर्दैवी घटना! बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू; जुन्नर तालुका हादरला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com