Amol Kolhe : शेवटची निवडणूक म्हटल्याने महागाई आटोक्यात येणार का? अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांना सवाल

Shirur Lok Sabha Election : मतदारसंघात १५ वर्षांत काहीही काम केलं नाही, त्यामुळे माजी खासदार सपशेल फेल ठरलेले असताना असा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी खरमरीत टीका अमोल कोल्हेंनी केली आहे.
Amol Kolhe
Amol KolheSaam Tv

सचिन जाधव

कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विचारला आहे.

Amol Kolhe
Amol Kolhe : माझे काका नटसम्राट नव्हते; अमोल कोल्हेंचं अजित पवारांना सडेतोड प्रत्युत्तर

मांजरी येथील जेतवन बुद्ध विहार ट्रस्टला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट दिली यावेळी डॉ. कोल्हेंनी असा सवाल उपस्थित केलाय. शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

उपस्थितांना संबोधित करताना अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या विधानावर देखील टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं. परवा कोणीतरी म्हटलं की पाहिजे तेवढा निधी देतो,पण कचाकच बटन दाबा. पण ही लोकशाही मूल्यांची अवहेलना होत आहे. हा निधी आपल्याच पैशातून दिला जातो , असा आरोप अमोल कोल्हेंनी केलाय.

आढळराव पाटील यांनी देखील आपल्या खेडच्या प्रचार दौऱ्यात उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करत शेवटची निवडणूक म्हणून जाहीर केलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्या आधीच त्यांनी सांगून टाकलं की, त्यांची ही शेवटची निवडणूक. समोर पराभव दिसत असल्याने सहानुभूती मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. कोल्हे यांनी बोलताना सांगितलं.

१५ वर्षाच्या संसदीय कामगिरीच्या जोरावर निवडणूकला सामोरे जायला हवं होतं.परंतु तसं काहीच पाहायला मिळत नाही.केवळ वैयक्तिक टीका आणि सहानुभूती या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जातोय. याशिवाय मतदारसंघात १५ वर्षांत काहीही काम केलं नाही, कोणताही मोठा प्रकल्प आणता आला नाही. त्यामुळे माजी खासदार सपशेल फेल ठरलेले असताना असा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी खरमरीत टीका अमोल कोल्हेंनी केली आहे.

Amol Kolhe
Ajit Pawar: अजित पवार यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल, चौकशीचे आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com