Loksabha Election: संभाजीनगरमध्ये सेनाविरूद्ध सेना; ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते भिडले

Sambhajinagar Loksabhar election : संभाजीनगरमध्ये निवडणूक प्रचारासवेळी ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार राडा झाला.
Sambhajinagar Loksabhar election
Sambhajinagar Loksabhar electionsaam Tv

माधव सावरगावे/मयुरेश कडव

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक प्रचारासवेळी ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार राडा झाला. प्रचारावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी विरोधी उमेदवार भुमरेंना डिवचलं. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते बिथरले. आणि त्यातूनच जोरदार राडा झाला.

संभाजीनगरच्या क्रांती चौकातलं हे हाणामारीचं चित्र. ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराचा प्रचार करत होते. मात्र आमने सामने येताच इथं प्रचाराऐवजी रंगला तो राडा. क्रांती चौकात दोन्ही गट समोरा समोर येताच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी दारूच्या बाटल्या दाखवत शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरेंना डिवचलं. त्यांचा थेट रोख होता तो भुमरेंच्या व्यवसायाकडे. मात्र महायुतीच्या कार्यकर्त्यांना ही बाब चांगलीच झोंबली. त्यांनीही आईसक्रीम दाखवत ठाकरे गटाच्या मशालीची खिल्ली उडवली, यात मनसेचे कार्यकर्ते पुढे होते

हा वाद इथेच संपला नाही. दानवेंनी याहीपुढे जाऊन मनसे कार्यकर्त्यांवर100-100च्या नोटा ओवाळत त्यांना चांगलंच खिजवलं. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते संतापले आणि इथं एकच गोंधळ उडाला. जर कोणी आमच्यावर हात उचलत असेल तर आम्हीही हात तोडून काढू.दारू पाहिजे की पाणी पाहिजे. दारूचा व्यवसाय भुमरेंचा नाही ते सांगावं.आम्ही दारू दाखवली. आमचं काही असेल तुम्ही काही दाखव, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलीय.

यावर बोलताना संदिपान भुमरे म्हणाले, दोन्ही गटात हाणामारी झाली नाहीये. दोन्ही गटातील कार्यकर्ते रॅली काढत आहेत. चंद्रकात खैरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवीगाळ करणं शोभत नाही.त्यांची रॅली दोनशे लोकांची आहे, आमची हजारो लोकांची आहे. शिवीगाळ करणं त्यांना शोभत का, शिवीगाळ केली नाही पाहिजे असं मला वाटतं.

काय म्हणाले खैरे

जनता आमच्यासोबत आहे गद्दरांसोबत नाही. मी असतो ना गद्दरांना सरळ करू टाकलं असत, अशी प्रतिक्रिया खैर यांनी दिली. राजकीय राडा तसा छत्रपती संभाजी नगरकरांसाठी नवीन नाही. आतापर्यत इथं खैरे विरूद्ध जलील असाच संघर्ष होता मात्र यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच सेना विरूद्ध सेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय.

Sambhajinagar Loksabhar election
Jalna lok sabha: कोण होणार जालन्याच्या खासदार? भाजपाचा विजयी रथ काँग्रेस रोखणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com