Maharashtra Politics: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार, नारायण राणेंसाठी घेणार सभा

Raj Thackeray News: मनसेप्रमुख राज ठाकरे यांची तोफ आता सिंधुदुर्गात धडाडणार आहे. रत्नागिरीच्या सभेतून नारायण राणेंनी राज ठाकरे नसल्याची खंत व्यक्त केली आणि लगेचच मनसेकडून 4 रोजी सिंधुदुर्गात राज ठाकरेंच्या सभेची घोषणा करण्यात आलीय.
Raj Thackeray and Narayan Rane
Raj Thackeray and Narayan RaneSaam Tv

Raj Thackeray News:

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची तोफ आता सिंधुदुर्गात धडाडणार आहे. रत्नागिरीच्या सभेतून नारायण राणेंनी राज ठाकरे नसल्याची खंत व्यक्त केली आणि लगेचच मनसेकडून 4 रोजी सिंधुदुर्गात राज ठाकरेंच्या सभेची घोषणा करण्यात आलीय. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत राणेंवर निशाणा साधला. याच सभेला उत्तर देण्यासाठी आता राज ठाकरे कोकणच्या मैदानात उतरणार आहेत.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंचं वैर अवघ्या महाराष्ट्राला परिचयाचं आहे. तशीच राज ठाकरे आणि नाराय़ण राणेंची मैत्रीदेखील सर्वश्रृत आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडली तरीही दोघांमधली मैत्री कायम राहिली. एवढच नाही तर राज ठाकरेंनी जाहीर सभेतून राणेंनी शिवसेना सोडल्याचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलं होतं.

राज राणेंच्या मदतीला

2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसची वाट धरली. तर 2006 मध्ये राज ठाकरेंनी मनसेची स्थापना करून आपला वेगळा संसार थाटला. मात्र दोन्ही नेते राजकीय मंचावर कधीच एकत्र आले नव्हते. शिवसेनेतून वेगळी वाट धरून बाहेर पडलेले नेते आता लोकसभा निवडणुकीच्या वळणावर एकत्र आलेत.

राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभेतून नारायण राणेंसाठी बोलणार आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात विरुन गेलेले नारायण राणे, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे किस्से राज ठाकरे नव्याने उलगडणार की उद्धव ठाकरेंवर टीका करून सिंधुदुर्गाचं मैदान आणखी तापवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com