Savaniee Ravindrra: अत्यंत खेदजनक! मत न देताच परत यावं लागलं, सावनी रवींद्रने व्यक्त केला संताप

Pune Lok Sabha Election 2024: प्रसिद्ध मराठी गायिका सावनी रवींद्रला (Savani Ravindra) मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
Savaniee Ravindrra
Savaniee RavindrraSaam Tv

पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election) आज मतदान होत आहे. पण पुण्यामध्ये मतदान प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक जणांचे नाव मतदार यादीमध्ये नाही, काहींना मतदान करताच आले नाही, तर काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा प्रकार देखील घडला आहे. अशामध्ये प्रसिद्ध मराठी गायिका सावनी रवींद्रला (Savani Ravindra) मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे सावनीला मतदान न करताच घरी परतावे लागले. सध्या सावनीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सावनी रवींद्रने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'गेले अनेक दिवस सर्व ऑनलाइन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज वोटिंग बूथला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. (ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी.) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही.'

तसंच, 'या बद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली. त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले. अत्यंत खेदजनक.', असे सावनीने सांगितले. मतदान न करता आल्यामुळे सावनीने संताप व्यक्त केला आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Savaniee Ravindrra
Suyash Tilak: मला तो हक्क बजावता आला नाही, मतदान करता न आल्यामुळे सुयश टिळकने व्यक्त केली खंत

दरम्यान, पुण्यामध्ये अभिनेता सुयश टिळकला देखील मतदान करता आले नाही. त्याने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत खंत व्यक्त केली. मतदान बूथवर दुसरेच नाव आल्यामुळे सुयश टिळकला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. सुयश टिळकने वेगवेगळ्या बूथवर जाऊन आपले नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्याचे नाव सापडले नाही. अशामध्ये यावेळी मला तो हक्क बजावता आला नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.

Savaniee Ravindrra
Pune Voting: पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार उघड, काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच केलं मतदान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com