PM Modi Nagpur Sabha: प्रत्येक रेती चोराचा हिशोब करणार, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल

CM Devendra Fadnavis Speech From Nagpur Sabha: नागपूरमध्ये नरेंद्र मोदींची सभा होत आहे. या सभेत देवेंद्र फडणीस यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. विदर्भात होणाऱ्या होणाऱ्या रेतेचोरीवरूनही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मोठ्या
PM Narendra Modi Nagpur Sabha:  प्रत्येक रेती चोराचा हिशोब करणार, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल
CM Devendra Fadnavis Speech From Nagpur PM Modi Sabha: Sand Thief Will Be Held Accountable Says Devendra Fadnavis and Tagetted Congress, Opposition PartyPM Narendra Modi Live
Published On

PM Narendra Modi Sabha Nagpur

नागपूरमध्ये नरेंद्र मोदींची सभा होत आहे. या सभेत देवेंद्र फडणीस यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. विदर्भात होणाऱ्या होणाऱ्या रेतेचोरीवरूनही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये रेती चोर आहेत आणि या रेती चोरांना सोडणार नाही. प्रत्येक रेती चोराचा हिशोब करणार आहे, असा टोला त्यांना सुनील केदार यांचं नाव न घेता लगावला आहे.

नो बर्वे ओन्ली पारवे हा नारा आहे. तसंच यावेळी सर्व रेकॉर्ड तोडून नितीन गडकरी निवडणून येणार आहे. देशाचा नेता निवडायचा आहे. धनुष्यबाण घडी असो की कमळ यातील कुठलीही बटन दाबले तर वोट मोदींना जाणार आहे. दुसऱ्या कोणाला दिलं राहुल गांधी यांना वोट जाणार आहे. त्यामुळे वोट कोणाला द्यायचं आहे ते ठरवून घ्या.आज मोदींच्या नेतृत्वात केलेला चमत्कार आपण पाहत आहे.

रामटेक गड मंदिराला 150 कोटी दिले. ड्रॅगण पॅलेस टेम्पल होत आहे. दीक्षा भूमीत अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात येत आहेत. चंद्र, सूर्य असेपर्यंत हे संविधान कोणीच बदलू शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनच घर विकायला गेले. आमच्या सरकारने ते घर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.

PM Narendra Modi Nagpur Sabha:  प्रत्येक रेती चोराचा हिशोब करणार, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल
Ashok Chavan: नाना पटोलेंमुळे काँग्रेसने जागा गमावल्या, मविआच्या जागावाटपावरून अशोक चव्हाण यांची टीका

काँग्रेसने ८० वेळा संविधान बदललं; नितीन गडकरींचा दावा

विदर्भातील जनता 10 पैकी 10 जागा निवडून देईल असा विश्वास व्यक्त करतो. कन्हान नदीवर मेट्रो पूल बांधून कन्हान पर्यंत मेट्रो आणणार आहे. जात पंथ धर्माचा आधारावर आमचं सरकार निर्णय घेत नाही. सबका साथ सबका विकास समोर ठेवून काम केलं. 60 वर्षात नाही झालं, ते 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं. मात्र विरोधक कन्फ्युज करण्याचं काम करतात. संविधान बदलू शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. 80 वेळा संविधान बदलण्याचं काम तर कॉंग्रेसने केले. इंदिरा गांधीच्या काळात अनेक निर्णय हे संविधान विरोधी होते, असा आरोप त्यांनी केला.

PM Narendra Modi Nagpur Sabha:  प्रत्येक रेती चोराचा हिशोब करणार, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल
Maharashtra Politics 2024 : सांगलीवरून हाय होल्टेज ड्रामा; विश्वजीत कदम, विशाल पाटील यांचा महाविकास आघाडीला पुनर्विचार करण्याचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com