Maharashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर?

Maharashtra Election : पाचव्या टप्प्यानंतर आता देशात लोकसभेच्या जवळपास 80 टक्के मतदारसंघातील मतदान पार पडलंय. मात्र राज्यात पहिल्या 5 टप्प्यातील आकडेवारी पाहता कमी मतदान झालंय.. त्यामुळे हा घटलेला टक्का कोणाच्या मदतीला येणार आणि कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे...पाहूया एक खास रिपोर्ट
Maharashtra Election:  26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर?
Maharashtra Election file pic

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याची संधीही महाराष्ट्राने गमावली. पाच टप्प्यांमधल्या काही मतदारसंघात अधिक तर काही मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद करण्यात आलीये. संपूर्ण राज्याची मतदानाची टक्केवारी गेल्या लोकसभेच्या तुलनेत घसरलीय.

2019 मध्ये 64.1 टक्के मतदान झाले होते. तर यंदा हीच टक्केवारी 61.29 टक्क्यांपर्यंत खाली आलीय. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली असल्याच्या चर्चा सातत्यानं रंगल्या. या पाच वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले तर काँग्रेसमधील बरेच नेते भाजपवासी झाले. त्यामुळे याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचा अंदाज आहे. अखेरच्या टप्प्यातही राज्यात केवळ 54.33% टक्के मतदान झाले. या टप्प्यात सर्वाधिक मतदारसंघ हे मुंबई महानगर परिसरातील होते. मुंबईकरांनी गेल्यावेळच्या तुलनेत मतदानाकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं.

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी सरळ लढत झाली. या निवडणुकीत राज्यात मोदींच्या 18 सभा आणि 1 रोड शो झाला. भटकती आत्मा ते नकली शिवसेना..400 पार ते तडीपार असे अनेक आरोप-प्रत्यारोप रंगले. मात्र राजकीय पक्षांमधला उत्साह मतदारांमध्ये नाही. त्यामुळे हा घटलेला टक्का कुणाला फायदेशीर ठरणार आहे कुणाच्या विजयाचं गणित बिघडवणार त्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com