Maharashatra Election: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुटणार ठाण्याच्या जागेचा तिढा? महायुतीचा ठरणार उमेदवार?

Maharashtra Lok Sabha Election : गुढी पाडव्याला ठाणे लोकसभेचा महायुतीचा उमेदवार ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान महायुतीचा उमेदवार ठरवण्यात विलंब ठरत असल्याने अनेक नेत्यांची चिंता वाढू लागलीय. राज्यात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे.
Maharashtra Lok Sabha Election
mla Pratap Saranaiksaam Tv
Published On

(विकास काटे, ठाणे)

Maharashtra Lok Sabha Election Thane Mahayuti Thane Candidate :

महायुतीचा ठाणे मतदारसंघातील उमेदवार कोण असेल याचा फैसला गुढी पाडव्याला होणार असल्याचं प्रतिपादन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. महायुतीच्या लोकसभेच्या जागांची तिढा अद्यापही सुटला नाहीये. राज्यातील बहुतेक मतदारसंघात तिन्ही पक्षात वाद सुरूय. (Latest News)

अनेक जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा ठोकण्यात येत असल्याने तेथे वाद कायम आहे, या वादांच्या जागांपैकी एक जागा म्हणजे ठाणे मतदारसंघ. ठाणे मतदारसंघावरून महायुतीचा तिढा कायम असून येत्या गुढी पाडव्याचा याचा तिढा सुटणार असल्याचं प्रतिपादन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय. गुढी पाडव्याला ठाणे लोकसभेचा महायुतीचा उमेदवार ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान महायुतीचा उमेदवार ठरवण्यात विलंब ठरत असल्याने अनेक नेत्यांची चिंता वाढू लागलीय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना महायुतीचा उमेदवार गुढीपाडव्याला गुढी उभारणार असल्याचे संकेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेत. ठाणे लोकसभा उमेदवार मुख्यमंत्री आणि महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील. सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मतदारांपर्यंत मत मागण्यासाठी जातं आहोत. आमचा उमेदवार जरी ठरत नसला तरी आमचा पक्ष महायुती आणि आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचं सरनाईक म्हणालेत.

पंतप्रधान मोदींच्या नावाने लढवणार निवडणूक

ठाणे महायुतीचा गड आहे, आधीपेक्षा मोठ्या मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. एक चेहरा समोर आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींचा आणि तोच महत्वाचा आहे . स्थानिक पातळीवर निर्णय घेतला नसला तरी मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी काम करणार असल्याचे सरनाईक म्हणालेत.

संभाव्य उमेदवार म्हणून यादी मोठी आहे, पण जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची आमच्या सर्वांची जवाबदारी आहे. महायुतीचा उमेदवार येत्या गुढीपाडव्या पर्यंत जाहीर होईल, अशी माझी खात्री आहे, गुढीपाडव्याला महायुतीच्या नावाने उमेदवार गुढी उभारणार असल्याचं सरनाईक म्हणालेत.

Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Election 2024 : मोहिते पाटील-निंबाळकरांचं ठरलं! कोणत्या चिन्हावर लढणार निवडणूक? कोणाला मिळणार उमेदवारी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com