Sanjay Raut: कोल्हापूरची जागा सोडली; पण सांगलीच्या जागेवर आम्ही ठाम : संजय राऊत

Sanjay Raut News: राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. या संदर्भात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक सिल्वर ओकवर पार पडणार आहे. तत्पुर्वी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

मयुर राणे, मुंबई|ता. २१ मार्च २०२४

Sanjay Raut Press Conference:

राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. या संदर्भात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक सिल्वर ओकवर पार पडणार आहे. या बैठकीला ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले तर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. तत्पुर्वी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सांगलीच्या जागेवर ठाम असल्याचे सांगितले आहे. (Loksabha Election 2024)

काय म्हणाले संजय राऊत?

"काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. हे पत्र एकत्र येऊन इंडिया आघाडी आहे. आम्ही राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड येथे सीट मागत नाही. प्रादेशिक पक्ष आपला राज्यातील सीट मागत आहेत, त्यांचे अस्तित्व कार्यकर्त्यांवर अवलंबून असते," असे राऊत म्हणाले.

सांगलीच्या जागेवर ठाम..

तसेच "कोल्हापूरची जागा सीटिंग आहे, आम्ही ती हसत हसत सोडली. मात्र आम्ही सांगलीच्या जागेवर ठाम आहोत. आज सकाळीच शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा झाली त्यानंतर सन्माननीय उद्धव ठाकरे आणि मी आणि आमचे काही प्रमुख लोक आम्ही कोल्हापूरकडे रवाना होत आहोत. श्रीमंत शाहू महाराज यांना भेटू. त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचा आशीर्वाद घेऊ," असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut
Maharashtra Weather Forecast: मुंबईत उन्हाचा चटका वाढतोय; विदर्भात अवकाळीचं संकट कायम

वंचितची नाराजी दूर होईल..

तसेच "प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली. महाराष्ट्रात चार जागावर त्यांनी लढावं हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला. तो प्रस्ताव मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता. मात्र सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात नाराजी किंवा अस्वस्थता असेल तर ते आम्हाला दूर करण्यात यश येईल, " असा दावाही संजय राऊत यांनी केला. (Latest Marathi News)

Sanjay Raut
Maharashtra Politics : राज ठाकरेंना NDA मध्ये घेण्याची गरज नाही, ते आल्याने फार फायदा होणार नाही : रामदास आठवले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com