Maharashtra Politics 2024 : आता तर नरेंद्र मोदींनी शरद पवारांना डोळा मारलाय; उद्धव ठाकरेंचा त्या वक्तव्यावर पुण्यातून जोरदार पलटवार

Lok Sabha Election 2024 : नंदुरबारमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं, अशी थेट ऑफर दिली होती. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

नंदुरबारमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं, अशी थेट ऑफर दिली होती. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. नरेंद्र मोदी इतके घाबरले आहेत की याला डोळा मार त्याला डोळा मारणं सुरू आहे. आता तर त्यांनी शरद पवारांना डोळा मारला आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आतापर्यंत नरेंद्र मोदींनी सगळं फोडलं. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. तरीही कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार असं चाललं आहे. कधी सांगायचं नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी. नंतर त्यांनाच डोळे मारायचे, म्हणायचं आजा मेरी गाडी मे बैठ जा. नरेंद्र मोदींनी कळलंय की ते आता पुन्हा दिल्ली बघणार नाहीत, म्हणून आज ते इतके घाबरले आहेत. महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार नाही हे लक्षात ठेवा, अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

नरेंद्र मोदी आमच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणाले. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची नकली संतान म्हणाले, त्यावरून उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला आहे का? खरंच बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा विचार करा. २०१४ मध्ये शिवसेनेचा पाठिंबा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदासाठी घेतला होता. मात्र तेव्हा मी युती तोडली नव्हती. २०१४ मध्ये तुम्ही युती तोडली तेव्हा काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला ? असा सवाल त्यांनी केला.

Maharashtra Politics 2024
Navneet Rana: हैदराबादमध्ये येते कोण अडवते बघतेच..., नवनीत राणा यांचा ओवैसी बंधूंना थेट इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन जी भाषा वापरत आहेत ती त्या पदाला अशोभनिय आहे. भारतात, महाराष्ट्रात अशी भाषा खपवूनच घेतली जात नाही. पंढरपूरच्या वारीतही फुगड्या वगैरे खेळून नंतर एकमेकांच्या पायाला हात लावून माऊली म्हणायची मराराष्ट्राची परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेमकं काय करायचं आहे त्यांनी ठरवावं, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Maharashtra Politics 2024
Lok Sabha Election : ऐन निवडणुकीत मतदान ओळखपत्र आढळली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात; जालना शहरातील घटनेने खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com