Maharashtra Politics 2024 : 'काँग्रेस असो की भाजप, गेले ते दिवस...', जाहीरनाम्यावरून बच्चू कडूंनी सूनावलं

Lok Sabha Election 2024 : आजपर्यंत कोणताही पक्ष काँग्रेस असो की भाजप जाहीरनाम्यानुसार वागत नाही. त्यामुळे त्या जाहीरनाम्याला काहीही अर्थ उरलेला नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा जाहीरनामा नव्हे तर खंजरनामा अशी टीका केली होती. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत कोणताही पक्ष काँग्रेस असो की भाजप जाहीरनाम्यानुसार वागत नाही. त्यामुळे त्या जाहीरनाम्याला काहीही अर्थ उरलेला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजपने सुद्धा 2014 च्या निवडणुकीत 50 टक्के नफा काढून भाव काढवू असं आश्वासन दिलं होतं. 2019 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू, असे जाहीरनाम्यात घोषित केलं होतं, मात्र भाजपने देखील जाहीरनाम्यानुसार आपले वचन पूर्ण केलेलं नाही. जाहीरनामा वाचू मतदार देखील मतदान करत नाहीत. आधी वचननामा जाहीरनाम्याला महत्त्व होतं, मात्र तो काळ गेला अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

Maharashtra Politics 2024
Shirur Lok Sabha Election: आढळराव पाटील डमी उमेदवार, अमोल कोल्हेंचा पुन्हा निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com