Maharashtra Lok Sabha Election : नाशिकच्या जागेवरून महायुतीत घमासान; छगन भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चांवरून शिंदे गटात अस्वस्थता

Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातवर शिंदे गटाने दावा केला आहे. मात्र छगन भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चांनी शिंदेंच्या गोटात अस्वस्थता आहे.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
Published On

Maharashtra Lok Sabha Election

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. भाजपनेही आपण दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनाचा खासदार निवडून आला होता, असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या या मतदारसंघावरून महायुतीत घमासान सुरू असतानाच छगन भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आलं आहे. हेमंत गोडसेंना डावलून भुजबळांना उमेदवारी देण्याच्या चर्चेने शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे शिंदे गटाने नाशिकच्या शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बौलावली आहे.

शिवसेना कार्यालयात तातडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. हेमंत गोडसे यांच्या जागी भुजबळांचं नाव पुढे आल्याने शिवसैनिक नाराज असल्याची बातमी आहे. अस्वस्थ शिवसैनिकांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. नाशिकची जागा राष्ट्रवादीला देऊ नये अशा सूर बैठकीत सुरू झाला आहे. आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, आपण संयम ठेवू. उत्तर महाराष्ट्रात आपल्याला एक जागा मिळावी अशी आपली मागणी आहे असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. या बैठकीला शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आहे. तर बैठक झाल्यानंतर सर्व पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघणार असल्याची माहिती आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेनेच्या़ बैठकीत नाशिकमध्ये शिवसेनेचाच उमेदवार असला पाहिजे ही भावना व्यक्त करण्यात आली आहे. हेमंत गोडसे हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आले आहेत. नवीन नावांची चर्चा सुरू आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांना आम्ही भेटायला जातोय. नाशिकच्या जागेवर पहिला अधिकार शिवसेनेचा आहे. त्यासाठी मुंबईला एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जात असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

Maharashtra Lok Sabha Election
Shivsena UBT vs Congress : 'आम्हाला हे पटलेलं नाही...', ठाकरे गटाची यादी जाहीर होताच काँग्रेसची तीव्र नाराजी

नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदे गटाकडे असून हेमत गोडसे विद्यमान खासदार आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू असताना शिंदे गटाने हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे सध्या या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात वातावरण चांगलंच तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी हेमंत गोडसे नाशिकहून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह मुंबई भेट घेतली होती. मात्र आता राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

Maharashtra Lok Sabha Election
Shivsena UBT Candidate List : काँग्रेसचा दावा असलेल्या जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार; महाविकास आघाडीत तणाव वाढणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com