Maharashtra Election 2024 : बाळासाहेबांचं नाव घेत CM एकनाथ शिंदेची पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री आज नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अनेक योजना सुरू करून सिंचनाचं काम केलं, मात्र यांनी सुरू केलेल्या योजना बंद केल्या, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.
Maharashtra Election 2024
Maharashtra Election 2024 Saam Digital

Maharashtra Election 2024

मुख्यमंत्री आज नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे सवंगडी समजायचे हे मात्र घरगडी समजतात. शिवसेनेत आजपर्यंत मोजता येणार नाहीत एवढ्या केसेस अंगावर घेतल्या आहेत. त्यामुळेचं कार्यकर्त्यांला मुख्यमंत्री करण्याचं काम बाळासाहेब यांनी केलं. शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. किती विकास केला याचे साक्षीदार इथे आहेत. छाती ठोकपने सांगतो, अनेक योजना देऊन सिंचनाचं काम केलं, मात्र यांनी सुरू केलेल्या योजना बंद केल्या, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

योजनांसाठी निधी देण्यासाठी मागील सरकारकडे पेन नव्हता मोजका निधी दिला, माझाकडे दोन पेन आहे, शेकडो कोटी निधी दिला आहे. लोकांचे जीव वाचत असतील तर हात आखता घेणार नाही. ही लेना बँक नाही तर देना बँक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आपल्या पक्षात कोणी मालक नाही, जो काम करेल तो आपल्या पक्षात राजा असेल. उद्या तुमच्यातील एखादा कर्तृत्वाच्या जोरावर मुख्यमंत्री झाला तर मला सर्वात जास्त आनंद होईल, असे उद्गार त्यांनी काढले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या दीड वर्षात केलेलं काम सर्वांसमोर आहे, मला मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता, पण धनयुष्यबाण वाचवायचा होता. त्यांना खुर्चीचा मोह आवरला नाही म्हणून आम्ही उठाव केला. महायुतीत आल्यानंतर सरपंच निवडून आले. आपण भूमिका चुकीची घेतली असती तर तुमाणे सोबत आले असते का? असा सवालही त्यांनी केला. लोकहिताचे निर्णय घेत असतांना पीक विमा दिला.नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी काम केलं, हे सरकार शेतकऱ्यांचे आहे.

Maharashtra Election 2024
Maharashtra Politics 2024 : काँग्रेस-शिवसेनेत पुन्हा वादाची शक्यता; सांगलीनंतर मुंबईतही ठाकरे गट देणार काँग्रेसच्या जागेवर उमेदवार?

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दवाखाना काढला. या हॉस्पिटमध्ये विरोधकांचीही सोय केली. मागील दीड वर्ष नैराश्याचे वातावरण होते. समृद्धीमुळे मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या मार्गावरून शेतकऱ्यांना शेतमाल लवकर मुंबई आणि मोठ्या शहरांमध्ये नेता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Maharashtra Election 2024
Maharashtra Politics 2024 : त्यांच्याकडे ना झेंडा ना अजेंडा; महाविकास आघाडीवर CM एकनाथ शिंदेंची बोचरी टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com