Loksabha Election: करोडोंची दौलत अन् राजेशाही थाट.. देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? संपत्तीचा आकडा पाहून डोळे फिरतील!

richest Candidate Of Loksabha Election 2024: देशातील सर्वात श्रीमंत उमेदवाराचे नाव समोर आले आहे. ज्याच्या संपत्तीचा आकडा पाहून तुमचेही डोळे गरगर फिरतील .
richest Candidate Of Loksabha Election 2024
richest Candidate Of Loksabha Election 2024Saamtv

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक नेता आपली संपत्ती, गुन्हे याबाबतचा तपशील देत आहेत. या माहितीमधून अनेक नेते गडगंज संपत्तीचे मालक असल्याचे समोर येत आहे. आता याच माहितीमधून देशातील सर्वात श्रीमंत उमेदवाराचे नाव समोर आले आहे. ज्याच्या संपत्तीचा आकडा पाहून तुमचेही डोळे गरगर फिरतील .

कोण आहेत श्रीमंत उमेदवार?

पेम्मासानी चंद्रशेखर हे आत्तापर्यंत दाखल केलेल्या अर्जामध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचे समोर आले आहे.चंद्रशेखर यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी ५,७८५.२८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

संपत्तीचा आकडा किती?

चंद्रशेखर हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात यश संपादन केले आहे. सन २०२२-२३ मध्ये त्यांचे उत्पन्न ३ लाख ६८ हजार ८४० रुपये होते, तर त्यांची पत्नी कोनेरू श्रीरत्न यांनी याच कालावधीत १ लाख ४७ हजार ६८० रुपये कमावले होते. चंद्रशेखर यांच्याकडे २३१६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये मुदत ठेवी, मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकीचा समावेश आहे.

richest Candidate Of Loksabha Election 2024
Uddhav Thackeray : सूरतेत एक जादू झाली अन् त्यांचा उमेदवार बिनविरोध आला; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

कोनेरू श्रीरत्न या २,२८९ कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेच्या मालक आहेत. याशिवाय स्थावर मालमत्तेबाबत बोलायचे झाले तर चंद्रशेखर यांच्याकडे ७२ कोटी २४ हजार २४५ रुपयांची आणि कोनेरू श्रीरत्नांची मालमत्ता ३४ कोटी ८२ लाख २२ हजार ५०७ रुपयांची आहे. मात्र, या दोघांवरही कर्जाचा मोठा बोजा आहे, ज्यामध्ये चंद्रशेखर यांच्यावर ५१९ कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि त्यांच्या पत्नीवरही तेवढेच कर्ज आहे.

richest Candidate Of Loksabha Election 2024
Nashik Onion Market: मोठी बातमी! नाशिकमधील कांदा लिलाव पुन्हा बंद; शेतकरी अडचणीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com