Lok Sabha Election 2024 : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला? मुंबईत पार पडणार संयुक्त पत्रकार परिषद

Allocation of Seats in Mahayuti : ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांसाठी महायुतीमधील तिढा सुटल्याची चर्चा आहे. यातील ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या तिन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडल्या गेल्यात, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Maharashtra Political News
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Maharashtra Political Newssaam tv

अभिजीत सोनवणे

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलीये. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी म्हणजेच उद्या होणार आहे. अशात अद्यापही महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र आज हा तिढा सुटणार असल्याचं म्हटलं जातंय. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट या तिन्ही पक्षांची आज पहिली संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Maharashtra Political News
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांवर प्रचार संपला, महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये 19 एप्रिलला मतदान

तिढा सुटला!

ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांसाठी महायुतीमधील तिढा सुटल्याची चर्चा आहे. यातील ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या तिन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडल्या गेल्यात, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. तर नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे आणि संदीपान भुमरे यांना औरंगाबादमधून उमेदवारी मिळू शकते. आज होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळू शकतो. येथे निवडणूक लढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक आहेत. तसेच किरण सामंत हे देखील या जागेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत या जागेचाही उमेदवार जाहीर होईल अशी माहिती सुत्रांकडून मिळालीये.

संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नसणार

दक्षिण मुंबईतील चर्नीरोड येथील ठक्कर येथे महायुतीची पहिली पत्रकार परिषद आज होणार आहे. या संयुक्त पत्रकार परिषदेला भाजपचे आमदार प्रसाद लाड, अजित पवार गटाकडून मंत्री अनिल पाटील आणि शिंदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या पत्रकार परिषदेपासून लांब असणार आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Maharashtra Political News
Special Report : Mahayuti Seat Allocation | महायुतीमध्ये अजूनही 7जागांना घेऊन रस्सीखेच |Marathi News

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com