Dhananjay Mahadik: कोल्हापुरात 'राजकीय' शर्यत! संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Loksabha Constituency: भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी लावलेल्या ५ कोटींच्या पैजेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSaam TV

रणजित माजगावकर, प्रतिनिधी|ता. १२ एप्रिल २०२४

Dhananjay Mahadik Speech:

कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त विधानाने राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आता भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी लावलेल्या ५ कोटींच्या पैजेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

काय म्हणालेत धनंजय महाडिक?

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत होणार आहे. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक मैदानात उतरले आहेत. याचवेळी चंदगड इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी संजय मंडलिकांना सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला ५ कोटींचा निधी देण्याची पैज लावली आहे.

लीड देणाऱ्या गावाला ५ कोटींचा निधी..

संजय मंडलिक (Sanjay Mahadik) यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यामध्ये ही शर्यत लावली असून सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटी रुपयांचा अधिकचा निधी देणार असल्याचा शब्द धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhananjay Mahadik
Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील ३ दिवस अवकाळीचा इशारा, मुंबईत उकाडा कायम

संजय मंडलिक निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यातून जास्त लीड पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची घोषणा या सभेतून धनंजय महाडिक यांनी केली. सध्या त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

Dhananjay Mahadik
Pooja Tadas : पूजा तडस यांचे तडस कुटुंबावर गंभीर आरोप; पंतप्रधानांनी लक्ष घालण्याचं आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com