Dharashiv Loksabha: खोटारडा, नौटंकीबाज, बोलबच्चन माणूस.. राणाजगजितसिंह पाटील यांचा ओमराजेंवर प्रतिहल्ला; तेरणा कॉलेजवरुन रंगला वाद!

Ranajagatsinh Patil Vs Omraje Nimbalkar: लोकसभेसाठी महायुतीकडून भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत होणार आहे.
Ranajagatsinh Patil Vs Omraje Nimbalkar:
Ranajagatsinh Patil Vs Omraje Nimbalkar:Saamtv

बालाजी सुरवसे,|ता. २१ एप्रिल २०२४

धाराशिवमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. लोकसभेसाठी महायुतीकडून भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत होणार आहे. अशातच तेरणा मेडीकल कॉलेज वरून राणा जगजितसिंह यांनी ओमराजेंवर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे.

तेरणा कॉलेजवरुन रंगला वाद!

धाराशिव लोकसभेचे वातावरण दिवसेंदिवस तापु लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेजचा मुद्दा प्रमुख बनला आहे. काही दिवसांपूर्वीच ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा मेडीकल कॉलेजने मोफत उपचाराच्या नावाखाली शासनाचे करोडो रुपये लाटल्याचा आरोप केला होता. याला आज आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत प्रतिउत्तर दिले आहे.

काय म्हणाले राणाजगजितसिंह पाटील?

"तेरणा मेडिकल कॉलेज धाराशिवला मंजूर होते ते मेडिकल कॉलेज मुंबईला नेले या आरोपाचा पुरावा दिल्यास राजकारण सोडेल, असे थेट आव्हान भाजपा आमदार राणा जगजितसिंह यांनी दिले आहे. तसेच खोटे नाटे आरोप केले तर खपवून घेतले जाणार नाही, फौजदारी कारवाई करु " यापुढे असा इशाराही भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना दिला आहे.

Ranajagatsinh Patil Vs Omraje Nimbalkar:
Unseasonal Rain: बळीराजावर आभाळ कोसळलं! राज्यभरात गारपीट, अवकाळीचा तडाखा; भाजीपाला, आंब्याच्या बागा उध्वस्त

ओमराजे बोलबच्चन माणूस..

यावेळी बोलताना "ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हा एक नंबरचा खोटारडा, नौटंकीबाज, बोलबच्चन माणूस आहे," असा आरोप ही राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. थोडक्यात लोकसभेच्या प्रचारात तेरणा कॉलेजवरुन भाजप- ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

Ranajagatsinh Patil Vs Omraje Nimbalkar:
Beed Accident News : मालवाहू गाडी- दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीवरील एका भावाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com