Nana Patole News: सांगलीचा वाद मिटेना! नाना पटोलेंचा संजय राऊतांना थेट इशारा; नेमकं काय म्हणाले?

Nana Patole On Sanjay Raut: महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन वाद संपत नसल्याचे चिन्ह दिसत आहे. यावरुनच नाना पटोले यांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
Nana Patole - Sanjay Raut
Nana Patole - Sanjay RautSaam Tv

पराग ढोबळे, नागपूर|ता. ७ एप्रिल २०२४

Sangli Loksabha Constituency News:

महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन वाद संपत नसल्याचे चिन्ह दिसत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने सांगली लोकसभेसाठी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेस विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहे. यावरुनच काँग्रेस ठाकरे गटात कलगीतुरा पाहायला मिळत असून नाना पटोले यांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

"संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या नौटंक्या बंद कराव्यात. काय बोलावे याचे मर्यादा ठरवाव्या. एका छोट्या कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करु नये, संविधान विरोधी सरकार आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, सामोपचाराने प्रश्न सोडवू, उद्या हा प्रश्न सोडवू," असे नाना पटोले (Nana Patole) यावेळी म्हणाले.

तसेच "एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये जातील, असे वाटत नाही. ते स्वाभिमानी नेते आहे, भाजपने त्यांना त्रास दिला, वाईट ट्रीटमेंट दिली. बलाढय नेते आहेत, स्वयंघोषित विश्व गुरू आहेत, मगं याला घ्या त्याला घ्या अस का करावं लागतं आहे," असा खोचक सवालही नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.

Nana Patole - Sanjay Raut
Akola Crime News: अकोल्यात चालंलय तरी काय? कारागृह निरीक्षकाला कॉलर पकडून बंदुकीनं उडवण्याची धमकी

दरम्यान, संजय राऊत यांनी याबाबत बोलताना "सांगलीमधून मविआचे उमेदवार चंद्रहार आहेत, आज सकाळीच काँगेस हायकमांडशी बोलणे झाले. चंद्रहार पाटील हेच सांगलीमधून उमेदवार असतील, असे म्हटले आहे. तसेच यासंबंधी विश्वजित कदम यांच्याशीही बोलणे झाले असून येत्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल," असे सूचक विधान केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nana Patole - Sanjay Raut
Supriya Sule : लोकसभा निवडणुकीआधीच सुप्रिया सुळेंना मोठा धक्का! प्रवीण मानेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com