Ravikant Tupkar: विश्वास ठेवा; पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही.. रेकॉर्ड ब्रेक रॅलीतून रविकांत तुपकरांची साद

Buldhana Loksabha News: सभेला लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सभेत बोलताना रविकांत तुपकर यांनी विश्वास ठेवा, पश्चातापाची वेळ येणार नाही, असे म्हणत मतदारांना साद घातली.
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Saam TV

संजय जाधव, बुलढाणा|ता. २१ एप्रिल २०२४

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांची विराट सभा खामगावमध्ये पार पडली. या सभेला लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सभेत बोलताना रविकांत तुपकर यांनी विश्वास ठेवा, पश्चातापाची वेळ येणार नाही, असे म्हणत मतदारांना साद घातली.

बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर हे जबरदस्त फाॅर्मात आहेत.अपक्ष असले तरी युवा, महिला आणि शेतकरी वर्ग तुपकरांच्या सभांकरिता मोठी गर्दी करत आहे. काल खामगावमध्ये खामगावात रविकांत तुपकर यांच्यासाठी निघालेली प्रचार रॅली अशीच रेकॉर्ड ब्रेक ठरली. या रॅलीने संपर्ण रजतनगरीत रविकांत तुपकरांचाच माहोल दिसून आला.

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांना वंदन करुन या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने ही विक्रमी रॅली फिरत असतांना, अल्पसंख्याक समाज तसेच सर्वच समाजघटकातील नागरिक, वयोवगृद्ध नागरिक, लहान-मोठे व्यापारी, शहरातील मध्यमवर्गीय जनता असे सर्वच स्तरातील लोक एकत्र आले होते.

Ravikant Tupkar
Gurugram Video: क्षणात होत्याच नव्हतं! स्मशानाची भिंत कोसळून ४ जणांचा मृत्यू; हृदयद्रावक घटनेचा VIDEO

उपस्थितांना संबोधित करताना माझ्यावर एक वेळ विश्वास ठेवा, तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, असे रविकांत तुपकर म्हणाले. तसेच रविकांत तुपकर हा सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आहे भिमरायांच्या लेकरांची संपूर्ण ताकद या शिवरायाच्या मावळ्यासोबत आहे त्यामुळे आता विजय आपलाच आहे, असे आश्वासन यावेळी ऑल इंडिया पॅंथर संघटनेचे अध्यक्ष भाई दिपक केदार यांनी दिले.

Ravikant Tupkar
Maharashtra Weather Forecast: राज्यात अवकाळीचा कहर कायम; मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com