Aaditya Thackeray: पाच वेळा खासदार झालेल्या भावना गवळी यांची सीट काढून घेतली, आदित्य ठाकरेंची CM शिंदेंवर टीका

Aaditya Thackeray On CM Eknath Shinde: ''त्यांना (शिंदे गटाला) नऊ सीट मिळाल्या. त्यातील पाच बदलल्या. ज्यांचे सीट बदलल्या, त्यांची अवस्था काय झाली असेल. पाच वेळा खासदार झालेल्या ताईंची (भावना गवळी) सीट काढून घेतली: आदित्य ठाकरे
पाच वेळा खासदार झालेल्या भावना गवळी यांची सीट काढून घेतली, आदित्य ठाकरेंची CM शिंदेंवर टीका
Aaditya Thackeray On CM Eknath ShindeSaam Tv
Published On

Aaditya Thackeray On CM Eknath Shinde:

>> संजय गडदे

''त्यांना (शिंदे गटाला) नऊ सीट मिळाल्या. त्यातील पाच बदलल्या. ज्यांचे सीट बदलल्या, त्यांची अवस्था काय झाली असेल. पाच वेळा खासदार झालेल्या ताईंची (भावना गवळी) सीट काढून घेतली,'' असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आज गोरेगाव आझाद मैदानात ठाकरे गटाची प्रचार सभा पार पडली. याच वेळी ते असं म्हणाले आहेत.

केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले की, जगभराने सांगितले की, नोटाबंदी फेल झाली. आज दहा वर्षांनी सांगा की नोटाबंदीचा काय फायदा झाला. लदाखमध्ये 370 कलम हटवला आम्हाला वाटलं चांगले दिवस येतील. लदाखमध्ये अजूनही आंदोलन सुरू आहेत.

पाच वेळा खासदार झालेल्या भावना गवळी यांची सीट काढून घेतली, आदित्य ठाकरेंची CM शिंदेंवर टीका
Vijay Wadettiwar: भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी आणि ओबीसी समाजासाठी काहीच नाही: विजय वडेट्टीवार

ते म्हणाले, महागाई कमी झाली का? 2014 मध्ये गॅसची किंमत किती होती? पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती होती आणि आता किती आहे. तुमच्या मतांवर ठरणार आहे की, हा देश कुठे जाणार आहे.'' आदित्य ठाकरे म्हणाले, नेहरूंनी काय केलं आणि कोणी काय केलं, हे पन्नास वर्षांपूर्वीच भांडत आहेत. भूतकाळावर किती दिवस बोलणार.

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की,''अमोल कीर्तिकर हे घाबरलेले नाहीत वाघ आहेत आणि ते दिल्लीत जाणार म्हणजे जाणार. दक्षिण भारताने भाजपसाठी दरवाजे बंद केले आहेत. केरळ कर्नाटकने दरवाजे बंद केले असून ते म्हणत आहेत की 400 पार करणार.''

पाच वेळा खासदार झालेल्या भावना गवळी यांची सीट काढून घेतली, आदित्य ठाकरेंची CM शिंदेंवर टीका
Kiran Samant: देवेंद्र फडणवीस निवडणूक लढू नका म्हणाले, तर मी थांबणार; किरण सामंत स्पष्टच म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केली मिमिक्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत आदित्य ठाकरे म्हणाले, ''एक खासदार आहेत, त्यांना उद्धव ठाकरे यांनी पाच वेळा तिकीट दिलं आणि त्यांना खासदार बनवलं. त्यांना यावेळी तिकीटचे सुद्धा दिले नाही. आज त्या ताई विचार करत असतील की, ज्यांना दिली सात त्यांनीच केला घात.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com