Bachchu Kadu: बच्चू कडू मैदानासाठी आक्रमक! प्रशासनही अ‍ॅक्शन मोडवर, दिलेली परवानगी केली रद्द

Amravati Lok Sabha: अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमरावतीमधील सायन्स कोर मैदानाची बच्चू कडू यांना मिळालेल्या परवानगी आता प्रशासनाने रद्द केली आहे.
बच्चू कडू मैदानासाठी आक्रमक! प्रशासनही अ‍ॅक्शन मोडवर, दिलेली परवानगी केली रद्द
Amravati Science Core Ground Saam Tv

Amravati Lok Sabha:

>> अमर घटारे

अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमरावतीमधील सायन्स कोर मैदानाची बच्चू कडू यांना मिळालेल्या परवानगी आता प्रशासनाने रद्द केली आहे. उद्या सायन्स कोर मैदानावर बच्चू कडू यांची सभा होणार होती. तर याच मैदानावर अमित शाह यांची सभा असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडू यान दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतेच याबाबत पत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये लिहिलं आहे की, ''23 व 24 तारखेला प्रहार पक्षाला दिलेली परवानगी रद्द केली असल्याचं शिक्षण अधिकारी यांच्या वतीने नोडल अधिकारी यांना कळविण्यात आलं. तसेच त्याची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी पोलीस आयुक्त व दिनेश बुब यांच्यातर्फे विवेक आवळे यांना देण्यात आली आहे.''

बच्चू कडू मैदानासाठी आक्रमक! प्रशासनही अ‍ॅक्शन मोडवर, दिलेली परवानगी केली रद्द
Maharashtra Lok Sabha: वंचित पूर्ण ताकदीने मैदानात उतरली! ३५ ठिकाणी दिले उमेदवार, या 6 जागांवर काँग्रेस-शरद पवार गटाला दिला पाठिंबा

यावरच प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले आहेत की, ''आम्हाला परवानगी देऊन प्रशासनाने रात्री 7 वाजता परवानगी नाकारली. आता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढची भूमिका स्पष्ट करू. कायदा तोडण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. आता न्यायालयात जाणार, पण न्यायालयावर पण शंका आहे.''

ते म्हणाले, ''आचार संहिताचा भंग अमरावती पोलिसांनी केला. आता जनतेने याला उत्तर द्यावं. 5 तास पोलीस आयुक्तांनी आमचा प्रचार थांबवला. दूध का दूध पाणी का पाणी करू. मला व उमेदवार दिनेश बुबला अटक करण्याचा राणा दाम्पत्याचा प्लॅन होता. राणा दाम्पत्य पोलीसावर दबाव टाकत आहे.''

बच्चू कडू मैदानासाठी आक्रमक! प्रशासनही अ‍ॅक्शन मोडवर, दिलेली परवानगी केली रद्द
Amravati News: अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा; बच्चू कडू मैदानाच्या परवानगीवरून आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची

दरम्यान, अमित शाह यांच्या सभेमुळे सभेची परवानगी नाकारली. असा खलबळजनक आरोप बच्चू कडू यांनी अमित शाह आणि पोलिस प्रशासनावर केला. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर बच्चू कडू यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, मैदानावरून गृहमंत्री अमित शाहा यांची सभा असल्यामुळे सुरक्षेचं कारण देऊन बच्चू कडूंची परवानगी नाकारण्यात आली. यामूळे काही काळ अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर तणावाचं वातावण पहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com