Sugar Craving : तुम्हाला सतत गोड खावस वाटतयं, न्यूट्रिशिस्टने सांगितले शुगर क्रेविंगची लक्षणें आणि उपाय

गोड खाण्याच्या या इच्छेला शुगर क्रेविंग असं म्हटल जातं.
Sugar Craving
Sugar Craving Saam Tv

Sugar Craving : तुम्ही सुद्धा गोड खाण्याचे शोकिन असाल तर तुम्ही ही बातमी पूर्ण वाचलीच पाहिजे. तुम्हाला सारखं गोड खावस वाटतंय का. तुमच्याजवळ मिठाई, चॉकलेट, कुकीज किंवा अजून कोणतेही गोड स्नॅक्स नसल्यावर तुम्हाला डायरेक्ट साखर आणि गुळ खावासा वाटतोय का. जर का तस असेल तर वेळीस सावध व्हा. सतत गोड खाण्याची ही सवय तुमच्या आरोग्यावर विपरीत परीणाम करू शकते.

गोड खाण्याच्या या इच्छेला शुगर (Sugar) क्रेविंग असं म्हटल जातं. यामध्ये तुमच्या शरिरातील साखर कमी किंवा जास्त या मुद्द्यांवर जोडलेली असते. परंतु सारखं गोड खावस वाटणे ही सवय अजिबात चांगली नाही आहे. तुम्हाला सतत शुगर क्रेवींग होत असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Sugar Craving
How to Control Blood Sugar Without Insulin : रक्तातील साखरेची वाढलेली पातळी इन्सुलिनशिवाय करा नियंत्रित, फक्त 'या' टिप्स फॉलो करा

नाहीतर तुमच्या शरिरातील साखरेच्या अनियमित प्रमाणामुळे तुमच्या जीवावर बेतू शकते. जर तुम्ही रोज 6 चमचे किंवा 24 ग्राम पेक्षा अधिक गोड खाता तर ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. सतत होणारी शुगर क्रविंग तुम्हाला जीवघेण्या आजारांची शिकार बनवू शकते. अशातच फूड (Food) एक्सपर्ट न्यूट्रिशनीस्ट रिद्धीमा बत्रा यांनी शुगर क्रेविंगपासून आपला बचाव कसा करावा याबद्दल काही खास टिप्स सांगितल्या आहेत.

NCBI च्या रिपोर्टनुसार जास्त प्रमाणात गोड खाणाऱ्या व्यक्तींना स्थूलपणा, ह्रदय रोग, मधुमेह आणि अल्कोहोलिक फॅट लिवर अशा गंभीर समस्या उद्भवतात. याशिवाय आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात साखर समजण्याच्या क्षमतेमध्ये कॅन्सर सारख्या भरपूर प्रकारच्या क्रोनिक आजारांशी निगडित असते.

एक्सपर्टच्या सांगण्यानुसार शरीरामधील लो ब्लड प्रेशर आणि हाई ब्लड प्रेशरमुळे शुगर क्रेविंग होऊ शकते. अशातच तुम्हाला तुमच्या डायटमध्ये प्रोटीन, भाज्या आणि फळे यांसारख्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल.

Sugar Craving
Blood Sugar Chart : कोणत्या वयात किती असायला हवी साखरेची पातळी? जाणून घ्या

त्याचबरोबर तुमचं पोट दिवसभर भरलेलं राहत आणि तुमच्या ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित राहते. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारात काही प्रोटीनयुक्त तसेच जींक, क्रोमियम, आयन, कॅल्शियम अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे. जेणेकरून तुमची शुगर लेवल नियंत्रित राहण्यास मदत होईल.

तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोली , पिस्ता, केळी, बदाम, जांभूळ आणि तीळ या पदार्थांच सेवन केलं पाहिजे. तुम्ही दिवसभरामधून आठ तास झोप घेतली नाही तर तुमच्या शरिरातील शुगर क्रेविंग वाढू शकते. त्यामुळे या पासून वाचण्यासाठी तुम्ही 7 ते 8 तास झोप घेतलीच पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com