world rivers day 2021: जागतिक नदी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या

world rivers day 2021: तुम्हाला माहित आहे का? सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा जागतिक नदी दिन म्हणून साजरा केला जातो.
world rivers day 2021: जागतिक नदी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या
world rivers day 2021: जागतिक नदी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्याSaam Tv News
Published On

आपल्या घरात येणारे पाणी हे नळातून येते. त्यामुळे आपल्यातील कित्येक लोकांना नदीचे महत्व फारसे लक्षात येत नाही. पण, इतिहासात डोकवलं तर आपल्याला लक्षात येतं की, मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी नदीचं फार महत्व आहे. कित्येक मानवी संकृती या नदीकाठी उदयास आल्या आणि बहरल्या. तर आज जागतिक नदी दिनाचे महत्व आणि तो केव्हा व कुणी सुरु केला हे जाणून घेऊयात. (world rivers day 2021: Why is world rivers day celebrated? Find out ab95)

हे देखील पहा -

जागतिक नदी दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ब्रिटीश जलतज्ज्ञ मार्क अँजेलो यांनी संयुक्त राष्ट्रसंघात मांडला. त्यांनी ब्रिटिश कोलंबियामधल्या अनेक नद्या स्वच्छ आणि सुडौल केल्या. त्यांचे एक वाक्य लक्षात राहिले, ‘‘कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे गेलेली नाही.’’ संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयानुसार २००५ मध्ये जगातील ६० देशांनी जागतिक नदी दिवस साजरा केला. या वर्षी हा दिवस २७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. मानवी संस्कृतीचा उदय आणि विकास नदीच्या काठी झाला. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नदीचे विशेष महत्व आहे. जगभरात प्रमुख सर्व शहरे नदीच्या काठी वसल्याची व विकास पावल्याचे आढळून येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज ८१ व्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करत विश्व नदी दिनाचं महत्त्व सागितलं. आज 'वर्ल्ड रिव्हर डे' आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यक्रमात नद्यांच्या महत्त्वाबाबत सांगितलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "नदी आपल्यासाठी एक भौतिक वस्तू नाही, तर जिवंत अस्तित्व आहे. म्हणूनच आपण नद्यांना आई म्हणतो. आपले कितीही सण-उत्सव असोत, ते सर्व आपल्या या मातेच्या कुशीतच होतात." पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आपल्याकडे असं म्हणतात की, "पिबन्ति नद्यः, स्वय-मेव नाम्भः" अर्थात नद्या आपलं जल स्वतः पित नाहीत, तर परमार्थासाठी देतात. आपल्यासाठी नद्या एक भौतिक वस्तू नाहीत, तर आपल्यासाठी नद्या जीवंत अस्तित्व आहेत. म्हणूनच आपण नद्यांना आई म्हणतो. आपले कितीही सण-उत्सव असोत, ते सर्व आपल्या या मातेच्या कुशीतच होतात." असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

world rivers day 2021: जागतिक नदी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या
मन की बात: नद्यांच्या महत्वासोबत जनधन खात्याबाबत काय म्हणाले PM, नक्की वाचा...

भारतात नद्यांची पुजा केली जाते, नद्यांना मातेसमान मानलं जातं. असं असलं तरीही नदी प्रदुषणाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतात नद्यांचे प्रदुषण रोखण्याकरता जागृकता निर्माण करण्याची आणि कडक पावले उचलण्याची गरज आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com