World EV Day 2023: 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त 25 हजार; किती देत रेंज?

Cheapest Electric Scooter In India: 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त 25 हजार; किती देत रेंज?
Avon E Scoot Electric Scooter
Avon E Scoot Electric ScooterSaam Tv

Cheapest Electric Scooter In India:

आज जागतिक EV दिवस आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला देशातील स्वस्त आणि चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगत आहोत. या ई-स्कूटरद्वारे दैनंदिन कामे सहज पूर्ण करता येतात. विशेषत: कॉलेज, विद्यापीठ किंवा कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही ई-स्कूटर चांगला पर्याय ठरू शकते.

तुम्ही ही स्कूटर EMI वर देखील खरेदी करू शकता. या फंकी दिसणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव एव्हॉन ई प्लस आहे. याची किंमत फक्त 25 हजार रुपये आहे. ही एका चार्जवर 50KM पर्यंत धावू शकते.

Avon E Scoot Electric Scooter
Investment Tips: 'या' सरकारी योजनेत मिळत आहे FD पेक्षा जास्त परतावा, गुंतवणुकीवर मिळणार सर्वाधिक व्याज

Avon E Plus चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Avon E Plus ई-स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, याची मोटरची पॉवर 220 वॅट्स आहे. यात 0.57 kWh चा बॅटरी पॅक आहे. याला पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 8 तास लागतात. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 50Km पर्यंत चालवता येते. (Latest Marathi News)

याची टॉप स्पीड 24 किमी प्रतितास आहे. म्हणजेच ही ई-स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची गरज नाही. नियमांनुसार ज्या वाहनांचा वेग ताशी 25 किमीपेक्षा जास्त असेल त्यांना परवाना आवश्यक असतो.  (Utility News)

Avon E Scoot Electric Scooter
LIC Policy: ही पॉलिसी एकदा खरेदी करा, आयुष्यभर मिळेल 11,192 रुपये पेन्शन

या स्कूटरमध्ये सिंगल सीट उपलब्ध आहे. जी खूप मोठी आणि आरामदायी आहे. फ्लॅट फूटरेस्ट आणि एक ट्रंक समोर उपलब्ध आहे. मागील बाजूस एक बूट स्पेस बॉक्स आहे. त्यात आवश्यक वस्तू ठेवता येतात. बॉक्समध्ये हेल्मेटही सहज येते. विशेष म्हणजे यात पेडल्सही उपलब्ध आहेत. जर कधी बॅटरी संपली तर ही स्कूटर पेडलच्या मदतीने सहज चालवता येते.

मासिक EMI किती असेल?

या स्कूटरची किंमत 25,000 रुपये आहे. याशिवाय तुम्हाला याच्या विम्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतील. आता समजा तुम्ही 5,000 रुपये डाऊन पेमेंट भरून ही ई-स्कूटर खरेदी केली तर तुम्हाला 20,000 रुपयांचे लोन बसेल. यातच कर्ज 5 वर्षांसाठी 8% व्याजदराने घेत असाल तर तुम्हाला दरमहा फक्त 406 रुपये EMI भरावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com