विहीर नेहमी गोलच का असते? यामागे काय आहे कारण?

द्रव पदार्थ साठवण्यासाठी ठेवला जातो तेव्हा तो ज्या आकारात साठवला जातो तोच आकार घेतो.
विहीर नेहमी गोलच का असते? यामागे काय आहे कारण?
Published On

मुंबई : विहीर आयताकृती, त्रिकोणी, चौकोणी कधीच नसते. सर्व विहिरी गोलच का असतात? याचा कधी तुम्ही विचार केला का? यामागे काय कारण आहे? यामागे वैज्ञानिक कारण आहे, यावर एक नजर टाकूया.

विहीर नेहमी गोलच का असते? यामागे काय आहे कारण?
Farmer Story: मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य 'फुल'ले, एका फोनवर दूर झाली अडचण

जेव्हा जेव्हा एखादा द्रव पदार्थ साठवण्यासाठी ठेवला जातो तेव्हा तो ज्या आकारात साठवला जातो तोच आकार घेतो. जेव्हा द्रव साठवले जाते तेव्हा ते मोठा दबाव निर्माण करते. त्यामुळे विहीर चौकोणी आकारात बनवली असेल तर तिच्या आत साठलेल्या पाण्याचा त्या विहिरीच्या भिंतीच्या कोपऱ्यांवर जास्त दाब पडेल. यामुळे विहिरीचे आयुष्य कमी होऊ शकते.

यामुळे विहीर खचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विहीर गोल आकाराची असल्याने पाण्याचा दबाव कोणत्याही ठिकाणी कमी जास्त जाणवत नाही. विहिरीच्या भिंतीवर पाण्याचा दाब सर्वत्र सारखाच राहतो. त्यामुळे गोल विहीर जास्त काळ टिकते.

आपण पाणी साठवून ठेवतो ती भांडीही कधी विविध आकारांची दिसणार नाही. जास्तीजास्त भांडी गोलाकार असतात. गोलाकार असल्यामुळे भांडीही बराच काळ टिकते.

विहीर नेहमी गोलच का असते? यामागे काय आहे कारण?
Navratri : नवरात्रीत कंडोमची होतेय सर्वात जास्त विक्री, कारणे आली समोर

विहिर गोल असण्यामागे आणखी एक कारण आहे. गोलाकार विहिरीची माती कमी ढासळते. कारण गोल विहिरीच्या भिंतीवर सर्व बाजूंनी समान दाब असतो. काही ठिकाणी तुम्हाला चौकोनी विहिरीही दिसतील पण त्या फार काळ टिकत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com