Marriage Survey: मुली लग्न करण्यास का तयार नसतात? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती झाली उघड

Benefits of Being Single Woman: आधी महिलांच्या यशस्वी जीवनाचा अंदाज त्यांच्या वैवाहिक जीवनावरून लावला जात होता. जर महिला त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी असतील तर त्या यशस्वी झाल्या असं म्हटलं जात होतं. परंतु आता महिला सुशिक्षित झाल्या असून लग्न आणि जीवनातील यश याचा काहीच संबंध नसल्याची समज महिलांमध्ये आलीय.
Marriage
Marriage Saam Tv
Published On

Why Girls Not Ready To Marriage :

लग्नाविषयी समजात असलेला विचार आता बदलू लागलाय. यशस्वी जीवन आणि लग्न यांचा काहीही संबंध नाही, ही समज अनेक महिलांना येत आहे. लग्नामुळे करिअरमध्ये अडथळा निर्माण होतो, त्यामुळे मुली आता लग्नकरण्याऐवजी एकट्याने जीवन जगण्यास प्राधान्य देत आहेत. यश मिळवण्यासाठी मुली कोणताही त्याग करण्यास तयार असतात असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. या सर्व्हेमध्ये मुली लग्न करण्यास का तयार नाहीत, त्या एकट्या का राहू इच्छित असतात का याचाही उलगडा करण्यात आलाय.(Latest News)

'मिंटेल' नावाच्या संशोधन करणाऱ्या एका संस्थेने याबाबत सर्व्हे केलाय. यात असा दावा करण्यात आलाय की, ४९ टक्के पुरुष सिंगल असताना खूश असतात. तर ६१ टक्के महिला ह्या एकट्या राहू इच्छित आहेत. या सर्व्हेमधील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे सिंगल महिलांमधील ७५ टक्के महिलांनी त्यांच्या जोडादाराचा शोध घेतला नाहीये. दरम्यान यात पुरुष देखील मागे नाहीत. ६५ टक्के पुरुषांनीही लग्नाचा विचार केलाय नाहीये.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणत्या कारणामुळे मुलींना लग्न करायचे नाही?

या सर्व्हेनुसार, लग्नासारख्या पवित्र नात्याची जबाबदारी पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त असते. महिलांवर लग्न टिकवण्याची जबाबदारी, घर, मुलांचा संभाळ, कुटुंबियांची काळजी घेणं, मुलांना संस्कार करणे अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या महिलांना पार पाडाव्या लागतात. या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये त्यांना त्यांच्यासाठी वेळ काढता येत नाही. काम नोकरीसह कुटुंबियाची जबाबदारी पार पडणं महिलांसाठी तारेवरील कसरत करण्यासारखं असतं.

लाखो जबाबदाऱ्यामुळे लग्नामध्ये त्यांची रुची राहत नाही. या पुरुष प्रधान देशात मुलींची घुसमट होतेय. त्या त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगायचं आहे, असा दावा या अहवालात करण्यात आलाय. लोक काय म्हणतील? याबाबतची चिंता बाजूला ठेवून महिला सुशिक्षित आणि स्वावलंबी होत असल्याचं देखील या सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान या सर्व कारणांमुळे आता अविवाहित महिलांची संख्या पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढू लागलीय.

लक्षात विशेष म्हणजे महिलांना एकटे राहण्यात कोणतीही अडचण येत नाहीये. महिलांच्या मते, आई, पत्नी होऊन त्यांना आनंद मिळेल किंवा त्यांचे जीवन सुखी होईल याची शक्यता नाहीये. जर एकटे राहून सर्व आनंद मिळत असेल तर यात चुकीचं काय आहे. महिला आता आत्मनिर्भर होत असल्याने त्यांना आता जोडीदाराची गरज भासत नाहीये.

या अभ्यासात असेही सांगण्यात आले की, 'काही मुली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये खूप आनंदी आहेत. त्यामुळे त्यांना लग्न करू वाटत नाहीये. त्यांना कोणत्याच जबाबदारीमध्ये अडकायचं नाहीये. त्यामुळे त्या लग्नापासून दूर राहत आहेत. या सर्व्हेमधील देशातील ८३ टक्के मान्य केलं की, त्यांनी लग्न केलं नसते तर त्यांच्या आयुष्यात त्या खूप आनंदी राहिल्या असत्या. त्यांना कोणत्याही बंधनात अडकू वाटत नाही. तर काही महिलांच्या मते, त्यांना लग्न करणयाची घाई नाहीये.

Marriage
Relationship Tips : नवऱ्याकडून बायकोला हव्या असतात या ५ गोष्टी, वेळीच मिळाल्या तर नात्यात टिकून राहातो गोडवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com