Car Windshield Design: कारची विंडशील्ड तिरकीच डिजाइन का करतात? जाणून घ्या त्यामागचे कारणं

Tilted Car Windshield: जर तुम्ही कार प्रवास करत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की कारची विंडशील्ड सरळ नसून तिरकी आहे.
Car Windshield
Car WindshieldSaam Tv
Published On

Reasons Behind A Tilted Windshield Of A Car : जर तुम्ही कार प्रवास करत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की कारची विंडशील्ड सरळ नसून तिरकी आहे. तुम्ही पाहीले असेल फक्त कारच नाही तर बस किंवा ट्रकचाही वेग जास्त असतो. असे असूनही बसची विंडशील्ड सरळ असते. आता पाहूयात त्यामागील कारण.

तुमच्या लक्षात आले असेल की कारमधील विंडशील्ड (Windshield) तिरकस असते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का असते. कार उत्पादक वाहनांमध्ये सरळ विंडशील्डऐवजी तिरपे विंडशील्ड लावतात याची अनेक कारणे आहेत, जसे की एरोडायनॅमिक्स, व्हिजीबिलीटी आणि सुरक्षितता. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

Car Windshield
Windshield Wipers : पावसाळा येण्यापूर्वी विंडशील्ड वायपरची कशी घ्याल काळजी, या स्टेप्स फॉलो करा

एरोडायनॅमिक्स -

जेव्हा कार (Car) चालते तेव्हा ती हवा फाडते आणि पुढे जाते. अशा परिस्थितीत गाडीची विंडशील्ड तिरकी असल्यामुळे वारा सहज कापला जातो. कारमध्ये, वरपासून मागील बाजूस तिरपे विंडशील्ड बसवल्याने हवा विरुद्ध दिशेने कमी होण्यास मदत होते. यामुळे वाहनाच्या वरच्या भागातून हवा सहजतेने बाहेर पडते. हे देखील मायलेज (Mileage) सुधारण्यास मदत करते.

व्हिजीबिलीटी -

तिरकस विंडशील्ड ड्रायव्हरसाठी व्हिजीबिलीटी सुधारण्यात देखील मदत करते, त्यामुळे ड्रायव्हरची व्हिजीबिलीटी वाढते. सुर्याची किरणे आणि इतर किरणांमुळे होणारी चमक कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे रस्ता पाहणे सोपे होते.

Car Windshield
Maruti First Electric Car : मारुतीची इलेक्ट्रिक SUV लवकरच येणार भेटीला; सिंगल चार्जमध्ये देईल 550km रेंज! जाणून घ्या किंमत व खासियत

सुरक्षा -

तिरकस विंडशील्ड देखील वाहनाची स्ट्रक्चरल इंटीग्रिटी आणि सुरक्षिततेमध्ये भूमिका बजावते. तिरप्यामुळे, टक्कर झाल्यास फोर्स कमी करण्यास मदत करते. टक्कर झाल्यामुळे ते वाहनाच्या फ्रेमच्या दिशेने आणि इजा होण्याचा धोका कमी करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com