Smartphone Scam : अचानक कुठे गायब झाला 251 रुपयाला मिळणारा स्मार्टफोन! तुम्ही देखील विकत घेतला होता का?

Scam 251 : जर तुम्हाला एखादा फोन खरेदी करण्यासाठी सांगितला तर सर्वात आधी प्रश्न येतो तो म्हणजे बजेटचा.
Smartphone Scam
Smartphone ScamSaam Tv

Smartphone Scam 251 : जर तुम्हाला एखादा फोन खरेदी करण्यासाठी सांगितला तर सर्वात आधी प्रश्न येतो तो म्हणजे बजेटचा. असं काय होईल तेव्हा, जेव्हा तुम्हाला तुम्ही कधीही कल्पना न केलेला बजेटमध्ये फोन मिळेल.

अशा फोनची कल्पना तुम्ही स्वप्नात सुद्धा केली नसेल. असं एक फोन घेऊन 2016 मध्ये Ringing Bells कंपनी आली होती. फोनची (Phone) किंमत फक्त आणि फक्त 251 रुपये एवढी होती आणि या खोट्या फोनची चर्चा फक्त देश नाही तर पूर्ण जगभरात झाली होती.

Smartphone Scam
Poco C55 Smartphone : 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह10 हजारांच्या आत Poco C55 लॉन्च !

18 फेब्रुवारी 2016 ही अशी तारीख आहे ज्या दिवशी सर्व व्यक्तींना असे वाटले होते की, 251 रुपयांमध्ये भरपूर काही खरेदी केले जाऊ शकते. एक कंपनी (Company) जी एक असं स्वप्न घेऊन आली होती, की त्याची फक्त कल्पनाच केली जाऊ शकते.

परंतु पहिल्यांदा लोकांना असं वाटलं की 251 रुपयांमध्ये काय नाही मिळू शकत. जर आज तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की, 251 रुपयांमध्ये काय मिळू शकते ? तर तुमचे उत्तर काय असेल ?

Smartphone Scam
Poco Smartphone Launch : 108 MP कॅमेरासोबत, POCO चे एकाचवेळी दोन स्मार्टफोन लॉन्च !

तसं पाहायला गेलं तर इतक्या कमी पैशांमध्ये अनेक गोष्टी खरेदी करता येऊ शकतात परंतु स्मार्टफोन खरेदी करणे हे कदाचित स्वप्नच राहील. काही वर्षांपूर्वी एका कंपनीने असंच काहीसं केलं होतं.

कदाचित या ओळी वाचून तुमच्या कल्पनेमध्ये त्या कंपनीच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. आम्ही फ्रीडम 251 बद्दल बोलत आहोत. एक असा स्मार्टफोन ज्याची किंमत फक्त आणि फक्त 251 रुपये एवढी होती.

प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका कंपनीने या स्मार्टफोनबद्दल निदान केले होते. 2016 साली कंपनीने सुरुवातीला अशा एका स्मार्टफोनबद्दल निदान केले होते, ज्याची फक्त कल्पनाच केली जाऊ शकते आणि हा स्मार्टफोन अजूनसुद्धा लोकांच्या फक्त कल्पनेतच सामावलेला आहे. कंपनीने असे निदान केले होते की, आम्ही फक्त 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन घेऊन येणार आहोत.

तसं पाहायला गेलं तर, 2016 मध्ये आजएवढी महागाई नव्हती. परंतू एवढी कमी सुद्धा नव्हती की, 251 मध्ये स्मार्टफोन येऊन जाईल. कंपनीने 18 फेब्रुवारीला ग्राहकांसमोर लॉन्च केले होते. या फोनची तुफान चर्चा झाल्याने, फक्त भारतच नाही तर जगभरातील अनेक मीडियामध्ये फोनची बातमी दाखवत होते.

251 फोनने गाजवल 2016 -

251 फोन बद्दल कंपनीने असं सांगितलं होतं की, ही ऑफर फक्त 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत आहे. या फोनसाठी अनेक व्यक्तींनी ऑनलाइन बुकिंग केली होती. परंतु मोठ्या संख्येने लोक वेबसाईटवर पोहोचल्यामुळे ती वेबसाईट क्रश झाली. कदाचित कंपनीला या गोष्टीचा अंदाज आला नसेल की, त्यांनी ग्राहकांना खूप मोठे वचन दिले आहे.

कंपनीने या फोनची रेग्युलर किंमत पाचशे रुपये एवढी सांगितली होती. अशातच एका फीचर्स फोनसाठी हजार रुपये खर्च करायला लागत असतील, आणि दुसरीकडे कॅमेरा, टच स्क्रीन, आणि अँड्रॉइड सारख्या फीचर्ससोबत पाचशे रुपयांमध्ये एक स्मार्टफोन मिळणे हे एका बंपर लॉटरीपेक्षा कमी नव्हते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com