WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप (Instant Messaging App) आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पेमेंटचा देखील ऑप्शन मिळतो. परंतु तुम्हाला WhatsApp वर मेसेज करण्यासोबतच पैसेही मिळाले तर? या प्लॅटफॉर्मवर युसर्सला कॅशबॅक मिळत आहे.
वास्तविक, वापरकर्त्यांना WhatsApp पेमेंट केल्यावर कॅशबॅक मिळत आहे. अॅप एका ट्रँजॅक्शनवर 35 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. परंतु ही ऑफर सर्व वापरकर्त्यांसाठी नाही, यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. (How to earn money online using whatsapp)
WhatsApp कॅशबॅक कसा मिळवायचा? (WhatsApp Cashback Offer)
WhatsApp पेमेंट्स वापरून पहिल ट्रँजॅक्शन केल्यावर तुम्हाला कॅशबॅक मिळेल. युजर्स या ऑफरचा तीन वेळा लाभ घेऊ शकतात, यासाठी त्यांना वेगवेगळ्या वापरकर्त्यांना तीन वेळा पैसे ट्रान्सफर करावे लागतील. WhatsApp कॅशबॅक मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
किती पैसे मिळतील?
व्हॉट्सअॅपची कॅशबॅक ऑफर वेगवेगळ्या युजर्ससाठी वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असणार आहे. जेव्हा तुम्हाला कॅशबॅक ऑफर मिळेल तेव्हाच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकाल. लवकरच तुम्हाला WhatsApp कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. तुम्ही इतर कोणत्याही WhatsApp वापरकर्त्याला पैसे ट्रान्सफर करून 35 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.
किमान मर्यादा नाही;
याबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे यासाठी किमान रकमेच्या व्यवहाराची (Transaction) मर्यादा नाही. म्हणजेच, तुम्ही कितीही रक्कम ट्रान्सफर करून कॅशबॅकचा लाभ घेऊ शकता. लक्षात ठेवा की युजर्सला फक्त तीन वेळा कॅशबॅक मिळेल. तसेच, एका युजरला पेमेंट केल्यावर तुम्हाला फक्त एकदाच कॅशबॅक मिळेल. म्हणजेच, जास्तीत जास्त तीन वेळा कॅशबॅक मिळविण्यासाठी, तुम्हाला तीन युजर्सला पैसे पाठवावे लागतील.
हे देखील पाहा-
या अटी पूर्ण कराव्या लागतील;
तुम्हाला कॅशबॅकसाठी काही अटी देखील पूर्ण कराव्या लागणार आहेत. यासाठी वापरकर्त्याचे खाते किमान 30 दिवस जुने असणे आवश्यक आहे. पेमेंटसाठी, वापरकर्त्यांना त्यांचे बँक डिटेल्स WhatsApp शी लिंक करावे लागतील.
तुम्ही ज्या व्यक्तीला पेमेंट कराल तोही व्हॉट्सअॅपवर असावा. एवढेच नाही तर इतर युजर्सनीही व्हॉट्सअॅप पेमेंटवर नोंदणी करावी. म्हणजेच, पाठवणार आणि स्वीकारणारा दोघांचेही WhatsApp पेमेंट खाते सेटअप असले पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.