Pop Music And Sleep : काय सांगता! पॉप म्युझिक ऐकल्याने लगेच येते झोप? संशोधनातून झाले सिद्ध

Pop Music : काही लोकांचा असा दावा आहे की, पॉप म्युझिक ऐकल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो.
Pop Music And Sleep
Pop Music And SleepSaam Tv

Music And Sleep : काही लोकांचा असा दावा आहे की, पॉप म्युझिक ऐकल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो. परंतु आत्ताच डेनमार्कमध्ये पॉप म्युझिकवर झालेल्या रिसर्चमध्ये थक्क करणारी एक गोष्ट समोर आली आहे. ते म्हटले जाते की म्युझिकमध्ये हील करण्याची पावर असते.

म्युझिक माणसांना स्ट्रेस (Stress), तणाव आणि डिप्रेशनपासून दूर ठेवण्यास मदत करते. मागील काही काळात म्युझिकला घेऊन अनेक रिसर्च (Research) झाल्या आहेत. ज्यामध्ये लाईट आणि लो टेंपो म्युझिक ऐकल्याने सुद्धा चांगली झोप येऊ शकते.

परंतु आत्ता केलेल्या अभ्यासामध्ये काही वेगळेच समोर आहे आहे. या शोधानुसार, कैची पॉप म्युझिक आणि प्लेलिस्टवरती दिसणारी गाणी ऐकल्यानंतर चांगली झोप लागू शकते.

Pop Music And Sleep
Sleeping On Stomach : तुम्हालाही पोटावर झोपण्याची सवय आहे ? पडू शकते महागात जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

दोन लाखांपेक्षा जास्त गाण्यांवर झाली आहे रिसर्च -

शोधकर्त्यांनी spotify वर 985 प्लेलिस्टमधून एकूण 225,626 एवढ्या गाण्यांवर विश्लेषण केले. या गाण्यांना सहा वेगळ्या कॅटेगिरीमध्ये वेगळे केल्यानंतर पहिले झोपेशी निगडित होते.

यामधून तीन सब कॅटेगिरी स्लो, लो टेंपो आणि विदाऊट लिरिक्सचे होते. अशातच अन्य 3 सबकॅटेगिरी पॉप म्युझिक वाल्या होत्या. प्लेलिस्ट मधून बीटीएसचे डायनामाईट गाणे सर्वात जास्त 245 वेळा लावले जाते.

Pop Music And Sleep
Difficult To Sleep : रात्री झोपणे खूप अवघड होत आहे का? 'या' योगप्रकाराणे होईल झोप पूर्ण

गाणे ऐकल्यानंतर झोप कशी काय येते?

बायलर युनिव्हर्सिटीमध्ये मनोवैज्ञानिक आणि न्यूरोसाइंसचे प्रो. मायकलच्या स्कुलिननुसार संगीत एकल्याने तुम्ही स्वताला रिलॅक्स फील करता आणि यामुळे कोणत्याही व्यक्तीला झोपण्यासाठी मदत मिळते. संगीत ऐकल्याने मनामध्ये चालणाऱ्या विचारांपासून थोडी विश्रांती मिळते.

2016 च्या एका अध्ययनामध्ये असे आढळून आले आहे की, संगीत ऐकल्याने तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी मदत मिळते. सोबतच झोपेमुळे ग्रस्त झालेल्या गर्भ महिलांना संगीत ऐकल्याने चांगली झोप लागते. विशेषतज्ञ सांगतात की जेव्हा व्यक्ती संगीत ऐकतो तेव्हा तो मनापासून खूश असतो. या सकारात्मक विचारांमुळे त्यांना चांगली झोप लागते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com