Earphones Side Effects: सावधान! इयरफोनचा अतिवापर करताय? उद्‌भवतील 'या' समस्या

सावधान! इयरफोनचा अतिवापर करताय? उद्‌भवतील 'या' समस्या
Earphones Side Effects
Earphones Side EffectsCanva
Published On

Earphones Side Effects: इअरफोनवर अनेकांना तासनतास गाणी ऐकायची सवय असते. मात्र या सवयींचा एका तरुणाला मोठा फटका बसला. कानात इन्फेक्शन झालं आणि ऐकण्याची क्षमताही कमी झाली. पण हे समजेपर्यंत खूप उशीर झाला होता.

तरुणाची ऐकण्याची क्षमता 60% कमी झाली. दोन शस्त्रक्रिया करूनही काही फायदा होत नसल्याने या तरुणाने दिल्ली गाठली आणि नंतर गांभीर्य दाखवत इम्प्लांट लावून ऐकण्याची क्षमता परत आणण्यात डॉक्टरांना यश आले.

Earphones Side Effects
Konkan Railway News: प्रवाशांनो लक्ष द्या! मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळा बदलल्या, पाहा नवीन वेळापत्रक

तुम्ही संगीत ऐकत असाल किंवा कॉलवर बोलत असाल तर दोन ते तीन तासांपेक्षा जास्त काळ इअरफोन वापरू नका, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यापेक्षा जास्त वापर केल्यास ते ऐकण्याच्या क्षमतेसाठी धोकादायक ठरू शकते. (Latest Marathi News)

प्राइमस हॉस्पिटलचे ईएनटी तज्ज्ञ डॉ. अंकुश सायल यांनी सांगितले की, 18 वर्षांचा तरुण रोज 8 ते 10 तास इअरफोनवर गाणी ऐकत असे. तो त्याचे इअरफोन त्याच्या मित्रांनाही शेअर करत असे. त्यामुळे कानात संसर्ग झाला होता. तो इअरफोन लावायचा तेव्हा कान बंद व्हायचे. यामुळे कानात बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते.

सुरुवातीला फक्त कानात वेदना होत होत्या, पण नंतर कानातून पल्स बाहेर यायला लागला. मूळचा यूपी मधील गोरखपूरचा रहिवासी असलेल्या या रुग्णावर या काळात स्थानिक रुग्णालयात दोनदा शस्त्रक्रियाही झाल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. डॉ.अंकुश सायल यांनी सांगितले की, तरुणाला रिपोर्टच्या आधारे अँटिबायोटिक्स देण्यात आली. त्यानंतर सिटी स्कॅन करण्यात आले. मागील शस्त्रक्रियेतून कानात काही गोष्टी शिल्लक असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी मास्टोइडेक्टॉमीद्वारे कान स्वच्छ केले.

Earphones Side Effects
Mumbai Crime News: हत्या करून झाला फरार, नाव बदलून विकत होता मिठाई; तब्बल 20 वर्षानंतर पोलिसांनी केलं अटक

श्रवण क्षमता पुनर्संचयित करण्यासाठी जर्मनीमध्ये तयार केलेले टायटॅनियम इम्प्लांट केले मग ऐकण्याची क्षमता परत आली. संपूर्ण उपचारासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च आला. डॉक्टरांनी सांगितले की, तरुण अनेकदा आमच्याकडे अशा समस्येने त्रस्त असतात, कारण हे लोक दिवसभर इअरफोन वापरतात. त्यांना हे माहीत नसते की, इअरफोन सतत जास्त वेळ वापरणे घातक ठरू शकतं. यामुळे गंभीर नुकसान होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com