Imbalance Hormones : असंतुलीत हार्मोन्सवर मात करायचे आहे ? या पदार्थांचे सेवन करा, होईल फायदा

Hormones Uncontrol : शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात आणि त्या सर्वांचे कार्य वेगवेगळे असते.
Imbalance Hormones
Imbalance HormonesSaam Tv

How To Control Imbalance Hormones : शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात आणि त्या सर्वांचे कार्य वेगवेगळे असते. त्यामुळे आपल्या शरीरात हार्मोन्सची पातळी नियंत्रित राहणे गरजेचे आहे.

अन्यथा अनेक गंभीर आजार (Disease) उद्भवू शकतात. हार्मोनल इनबॅलन्समुळे झोपेच्या पद्धतीत बदल, मूड स्विंग, सतत थकवा जाणवणे, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या, डोकेदुखी आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात.

Imbalance Hormones
Imbalance Hormones : हार्मोन्स इनबॅलन्स झाले आहेत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

हार्मोनल इनबॅलन्स आपण चांगली जीवनशैली आणि योग्य आहार याद्वारे नियंत्रित ठेवू शकतो.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टी सांगणार आहोत जे तुमच्या हार्मोनल इनबॅलन्सच्या समस्या दूर करतील. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल संपूर्ण माहिती.

कोबी -

कोबीचे सेवन करून तुम्ही हार्मोन्सचे प्रमाण संतुलित ठेवू शकता. कारण कोबीमध्ये असे अनेक घटक आणि संयुगे आहेत जे हार्मोन्सची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहकार्य करतात. तुम्ही कोबीचा आहारात (Diet) वेगवेगळ्या प्रकारे, तुमच्या आवडीनुसार समावेश करू शकता.

Imbalance Hormones
Flax Seeds For Hormonal Imbalance : हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरेल अळशी !

ब्रोकोली -

हार्मोन्सच्या समस्या दूर करण्यासाठी तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकता. ज्या लोकांच्या शरीरात एस्ट्रोजेन संप्रेरकचे प्रमाण खूप कमी आहे. त्यांच्यासाठी ब्रोकोली खूप फायदेशीर आहे. तसेच इनबॅलन्स हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी ब्रोकोली खूप फायदेशीर आहे.

टोमॅटो -

टोमॅटोमध्ये अनेक गुणधर्म असतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील हार्मोन्स पातळी सतत त्रास देत असेल, तर टोमॅटो हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

टोमॅटोमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे हार्मोन्स नियंत्रण करण्यासाठी टोमॅटो मदत करते. त्यामुळे आहारात टोमॅटोचा समावेश करून हार्मोन्स आणि इतर आरोग्यासंबंधित समस्या दूर शकता.

पालक -

पालकमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. त्यासोबतच इतर पोषकतत्व पालकमध्ये आढळतात. त्यामुळे पालक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पालकमध्ये असलेले आयर्नमुळे ॲनिमियाच्या समस्या दूर होतात. अनेक संशोधनानुसार सिद्ध झाले आहे की पालकचे सेवन केल्याने हार्मोनल इनबॅलन्सच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

बीटरूट -

बीटरूटमध्ये उपलब्ध असलेले पोषकतत्व आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हार्मोनल इनबॅलन्सच्या समस्येवर बीटरूट फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही बीटरूटचा तुमच्या आहारात समावेश करून हार्मोनल इनबॅलन्सच्या समस्या कमी करू शकता. सलादच्या किंवा भाजीच्या स्वरूपात बीटरूटचे तुम्ही नियमित सेवन करू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com