Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताना 'या' 4 चुका कधीही करू नका, अन्यथा वाढेल कर्जाचा बोजा !

क्रेडिट कार्ड वापरताना आपण अनेकदा अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्याला पुढे जाऊन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
Credit Card
Credit CardSaam Tv

Credit Card : आपल्यापैकी अनेकांकडे क्रेडिट कार्ड असेलच. काही ना याचा वापर कसा करायचा याबाबत माहित आहे तर काहींना याबाबत काहीच माहित नाही. क्रेडिट कार्ड वापरताना आपण अनेकदा अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्याला पुढे जाऊन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

आपल्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. याची सुविधा पैसे नसतानाही खर्च करण्याची परवानगी देते परंतु, यावर खर्च देखील मर्यादित करता येतो. आपल्या बँक स्टेटमेंटनुसार क्रेडिट कार्ड दिले जाते.

क्रेडिट कार्डवरील इतर कर्जापेक्षा क्रेडिट कार्डचा व्याजदर जास्त भरावा लागतो, परंतु जर तुम्ही वेळेवर पैसे भरले तर त्यावर व्याज लागू होत नाही. याशिवाय अशा काही चुका आहेत, ज्या अनेकदा क्रेडिट कार्डधारकांकडून होतात आणि त्यांना जास्त कर्ज भरावे लागते. क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही काय करू नये ते जाणून घ्या.

Credit Card
Credit Card Rule : क्रेडिट कार्डबाबत आरबीआयचा नवा नियम, कर्जाचा बोजा होणार कमी !

1. गरज नसल्यास दुसरे कार्ड बनवू नका

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास आणि तुम्ही दुसरे क्रेडिट कार्ड देखील खरेदी करत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला त्याची गरज आहे का ? त्याचा वापर केल्यानंतर पैसे भरता येईल का याचा विचार करा.

2. सगळ्या ठिकांणी क्रेडिट कार्डचा वापर नको

तुम्ही क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असाल तर विचार करूनच व्यवहार करा, असा सल्ला दिला जातो. अधिक व्यवहार केल्याने तुमच्यावर कर्जही अधिक होते. यासोबतच क्रेडीट कार्ड कुठे वापरलं जातंय हेही लक्षात ठेवायला हवं. जर तुम्ही जास्त पैसे खर्च केले आणि तुम्ही ते पैसे परत करू शकत नसाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

3. मर्यादेपर्यंत खर्च करा

अनेकदा असे दिसून आले आहे की CIBIL स्कोअर वाढवण्यासाठी लोक क्रेडिट कार्डच्या मर्यादेइतकेच पैसे काढतात आणि गरज नसतानाही ते खर्च करतात. जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा ते पैसे देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत कर्जाचा बोजा वाढतो. असे करू नका, जेवढे आवश्यक आहे तेवढेच पैसे खर्च करा.

4. EMI चा वापर टाळा

बरेचदा असे दिसून येते की, लोक सर्व पैसे (Money) काढून ते खर्च करतात आणि ते पैसे भरण्यासाठी मासिक हप्ते तयार करतात. यामुळे त्यांना व्याजासह जास्त रक्कम भरावी लागत आहे. तसेच कोणताही हप्ता चुकला तर अडचणीत येऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com