Upcoming Smartphones: आणखी काही दिवस वापरा तुमचा जुना फोन, या आठवड्यात लॉन्च होणार जबरदस्त स्मार्टफोन

Smartphones News: आणखी काही दिवस वापरा तुमचा जुना फोन, या आठवड्यात लॉन्च होणार जबरदस्त स्मार्टफोन
Upcoming Smartphones In Mid October
Upcoming Smartphones In Mid OctoberSaam Tv
Published On

Upcoming Smartphones:

गेल्या महिन्यात एकामागून एक फोन लॉन्च झाल्यानंतर आता नवीन स्मार्टफोन्सच्या लाँचिंगला ब्रेक लागला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत अॅपल सॅमसंगसारख्या अनेक मोठ्या कंपन्या हा ब्रेक तोडणार आहेत.

सॅमसंग या आठवड्यात बजेट स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, तर Apple या आठवड्यात आपला नवीन टॅबलेट बाजारात आणू शकते. याशिवाय चीनी ब्रँड या आठवड्यात आपले दोन नवीन स्मार्टफोन Oppo Find N3 आणि OnePlus Fold देखील सादर करू शकतात. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Upcoming Smartphones In Mid October
Mileage Bikes: एकदा टाकी फुल करा, संपूर्ण मुंबई फिरता येईल; जबरदस्त मायलेज देते Hero ची 'ही' बाईक

Samsung Galaxy A05s

नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, सॅमसंग या आठवड्यात बाजारात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च करू शकते. कंपनी 18 ऑक्टोबर रोजी Galaxy A05s नावाने नवीन फोन लॉन्च करू शकते. असे म्हटले जात आहे की, भारतातील Galaxy Ax5 सीरीजचा हा पहिला फोन असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फुल एचडी+ ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले असणार आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. तर 13MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. (Latest Marathi News)

Oppo Find N3 and OnePlus Fold

टीझर पोस्टवरून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही स्मार्टफोन 19 ऑक्टोबरला (गुरुवार) लॉन्च होणार आहेत. Oppo Find N3 चा लॉन्च इव्हेंट Oppo च्या अधिकृत चॅनेलवर लाईव्ह-स्ट्रीम केला जाईल. तर तुम्ही OnePlus Fold चा इव्हेंट OnePlus च्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहू शकाल.

Upcoming Smartphones In Mid October
Apple Festive Sale सुरु; आयफोनपासून मॅकबुकपर्यंत सर्व काही स्वस्त, काय आहेत ऑफर्स?

New iPads

स्मार्टफोनसोबतच या आठवड्यात अॅपल आपला नवा आयपॅडही बाजारात येऊ शकतो. एक रिपोर्ट्सनुसार, कंपनी 17 ऑक्टोबरला नवीन iPad मॉडेल सादर करू शकते. यावेळी या नवीन आयपॅड मॉडेल्समध्ये एक पॉवरफुल चिप देऊ शकते. चिपसेट व्यतिरिक्त या नवीन iPads मध्ये कोणतेही मोठे अपग्रेड्स नसतील असेही सांगितले जात आहे. नवीन iPad Air मध्ये M2 प्रोसेसर असू शकतो आणि iPad mini ला A16 Bionic CPU मिळण्याची अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com