ट्विटर आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. अनेकदा ट्विट करताना काही चुका होतात आणि त्यानंतर ते ट्वीट सरळ डिलिट करावे लागत होते. परंतु आता त्यापासून वापरकर्त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ट्वीटर सध्या एडीट बटनाच्या पर्यायावर काम करीत आहे. त्यामुळे नेहमी ट्वीटरवर सक्रिय राहणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अनेकदा ट्वीट डिलिट केल्याने संबंधित व्यक्तीला मानहानीला सामोरे जावे लागत होते आता यापासून काही प्रमाणात सुटका होणार आहे. दरम्यान, ट्विटरचा हा नवीन पर्याय सर्वांसाठी उपलब्ध आहे, की केवळ ज्या वापरकर्त्यांना ब्लू टीक मिळाली आहे त्यांनाच याचा लाभ घेता येईल, हे अद्याप अस्पष्ट आहे. (News on Twitter's New Feature)
ट्वीटर युजर Alessandro Paluzzi ने ट्वीटच्या एडीट बटनाची माहिती शेअर केली आहे. सोबतच त्याने या ट्वीटला कॅप्शन दिले आहे. सध्या एडीट बटनावर काम सुरु आहे.
तसेच कंपनीने एक पोस्टरदेखील शेअर केले आहे. यामध्ये ट्वीटला अपेडट करण्यासाठीचा एक पर्याय दिसून येत आहे. आता नव्या ट्वीटमध्ये हा ऑप्शन दिसून येत आहे. कंपनीकडून याची अधिकृत घोषणा किंवा माहिती समोर आली नसली तरी एडीट ऑप्शनबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
तर दुरसीकडे एका ट्वीटर युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातदेखील एडीट करण्याचा पर्याय दाखविण्यात आला आहे. हे दोन्ही युजर विना ब्लू टीकचे असल्याने या नवीन पर्यायाचा वापर सर्वांसाठी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.